नाशिक - शिवसेना नेते संजय राऊत यांना बोलण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र, भाजपकडून कोणाला धमकवण्यात आले, कुठे गुंडांचा वापर झाला, कोणावर दबाव टाकण्यात याचा एकतरी पुरावा त्यांनी द्यावा, असे आवाहन जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहे.
संजय राऊत यांना त्यांच्या पक्षाने त्यांना बोलण्याचा अधिकार दिला आहे. म्हणून ते बोलत आहेत. मात्र, युतीत तणाव निर्माण होईल, अशी वक्तव्ये त्यांनी करू नये, असेही महाजन म्हणाले. तर सत्तास्थापने बाबत बोलताना ते म्हणाले, पक्षाने आम्हाला बोलण्याचा अधिकार दिलेला नाही. तर आम्ही वेट अँड वॉचच्या भूमिकेत आहोत.
हेही वाचा - बरेवाईट करण्याचा विचार मनात आणू नका - आदित्य ठाकरेंचा शेतकऱ्यांना धीर
२४ ऑक्टोबरला विधानसभा निवडणुकीचा निकाल लागला. राज्यातील जनतेने महायुतीला स्पष्ट जनादेश दिला. मात्र, तरीदेखील इतके दिवस होऊनही मुख्यमंत्रीपदावरून भाजप-शिवसेनेमध्ये रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे सत्तास्थापनेला विलंब होताना दिसत आहे. तसेच भाजप-सेनेत तणाव निर्माण झाल्याचेही चित्र तयार झाले आहे.
हेही वाचा - शरद पवारांना आरे तुरे करणाऱ्यांना जितेंद्र जोशीने सुनावले खडे बोल, पाहा व्हिडिओ