नाशिक- महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांना देत असलेले ५ टक्के आरक्षण हे घटनाबाह्य आहे. हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही. मुस्लिम आरक्षणामुळे मराठा व ओबीसी आरक्षण धोक्यात येईल, असे सांगत महाविकास आघाडी सरकार मुस्लिमांची फसवणूक करत असल्याची टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटिल यांनी केली.
चंद्रकांत पाटील हे नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी सदर प्रतिक्रिया दिली. महाविकास आघाडीने दिलेली कर्जमाफी ही फसवी आहे. जे नियमित कर्ज भरतात त्यांना कोणताही दिलासा नाही. फडणवीस सरकारने दिलेल्या कर्जमाफीमुळेच २०१५ पासून पुढील कर्जमाफी हे सरकार देऊ शकले. सातबारा कोरा करण्याच्या आश्वासनाचे काय झाले, असा सवाल चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला.
हेही वाचा- उल्लेखनीय..! दिंडोरी तालुक्यातील झेडपीच्या शाळेतील विद्यार्थ्यांची डिजिटल हजेरी