नाशिक - तरुणीला लग्नाचे अमिष दाखवत तिचे नग्न फाेटाे काढून पाॅर्न साईटवर अपलाेड करणाऱ्या नाशकातील आराेपीला मुख्य न्यायदंडाधिकारी वसुंधरा भाेसले यांनी एक वर्ष कैद आणि एक लाख रुपये दंड ठाेठावला आहे. विशेष म्हणजे आयटी अँक्ट अन्वये नाशिकमध्ये सुनावलेली ही पहिलीच शिक्षा आहे. या गुन्ह्याचा तपास नाशिक शहर सायबर पाेलिस ठाण्याचे तत्कालीन वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अनिल पवार यांनी केला.
प्रेमाच्या जाळ्यात ओढले - अक्षय श्रीपाद राव (वय, 28 रा. खोडेनगर, इंदिरा नगर, नाशिक) असे शिक्षा ठाेठावलेल्या आराेपीचे नाव आहे. नाशिक शहरात सन 2017 मध्ये सायबर पोलीस ठाणे सुरु हाेत असताना पीडित तरुणीने फिर्याद दिली हाेती. त्यानुसार गुन्हा दाखल करुन वर्षभरात तपास करुन न्यायालयात दाेषाराेप दाखल करण्यात आले हाेते. आराेपी राव याने तरुणीशी ओळख वाढवत तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले हाेते. तसेच नंतर लग्न करण्याचे आमिष दाखविले हाेते. त्यातच जवळीकतेचा फायदा घेत राव याने पीडित तरुणीचे नग्न व अश्लिल फाेटाे काढले. त्यानंतर ते एका पाॅर्न साईटवर अपलाेड केले हाेते.
हेही वाचा - Cylinder Prices Increased : घरगुती सिलेंडरचे दर वाढले; किंमत पोचली 1 हजाराच्या टप्यात
पोलिसांचा तपास - पाॅर्न साईटवर फाेटाेंच्या माध्यमातून हजाराे रुपये कमविण्याचा त्याचा प्रयत्न हाेता. अनिल पवार यांनी तपास करुन न्यायालयात आवश्यक तांत्रिक पुरावे व फिर्याद सादर केली. त्यानुसार न्यायालयाने अखेर शुक्रवारी न्यायाधीश भोसले यांनी अक्षय रावला विनयभंग, आयटी अँक्ट अन्वये दोषी ठरवून एक वर्ष कैद व एक लाख रुपये दंड अशी शिक्षा सुनावली. गुन्ह्याचा तपास करणारे पोलीस निरीक्षक अनिल पवार हे सध्या वाडी वऱ्हे पोलीस ठाणे येथे कार्यरत आहेत.