ETV Bharat / state

नाशिकच्या मालेगावात अग्नितांडव; 35 हून अधिक घरं आगीत भस्मसात - नाशिकच्या मालेगावात अग्नितांडव

Malegaon Fire : नाशिकच्या मालेगाव शहरातून आगीची घटना समोर आलीय. मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात लागलेल्या आगीत 35 हून अधिक घरं जळून खाक झाल्याची घटना घडलीय.

Malegaon Fire
Malegaon Fire
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 24, 2023, 12:06 PM IST

नाशिकच्या मालेगावात अग्नितांडव

मालेगाव (नाशिक) Malegaon Fire : नाशिकच्या मालेगाव शहरातील आयेशा नगर भागात भीषण आग लागल्याची घटना घडलीय. यात मोठ्या प्रमाणात घरं आणि झोपड्या जळून खाक झाल्या आहेत. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलानं घटनास्थळी धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न केला. मात्र ही आग झपाट्यानं पसरत गेल्यामुळं सुमारे 35 पेक्षा जास्त झोपड्या आणि घरं अगीच्या विळख्यात सापडून खाक झाले आहेत. ही आग तब्बल 4 तासाच्या प्रयत्नानंतर आटोक्यात आली असून या आगीमुळं अनेकांचे संसार उघड्यावर आले आहेत. सुदैवानं यात जीवितहानी झाली नाही. या आगीचं कारण अस्पष्ट असून शॉर्टसर्किटमुळं ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

आग नेमकी कशी लागली : आग लागलेल्या या परिसरात छोटी वस्ती आणि लाकडांची घरं असल्यानं एका घराला लागलेली आग काही सेकंदात सर्वत्र पसरली. अवघ्या काही मिनिटांत आग सर्वदूर पसरली. मालेगाव महापालिकेच्या आग्निशामक पथकाच्या जवांनानी 11 फेऱ्या मारत आग आटोक्यात आणली. यात अनेक कुटुंबांचं नुकसान झालंय. तसंच ही आग नेमकी कशामुळं लागली याची माहिती मिळू शकलेली नाही.

हैदराबादतही आगीची घटना : हैदराबाद शहरातही शनिवारी सायंकाळच्या सुमारास अंकुरा रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडलीय. या आगीमुळं रुग्णालयाच्या इमारतीत अनेक रुग्ण अडकले होते. ही आग लागल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. या इमारतीच्या पाचव्या मजल्याला आग लागल्यानंतर ही आग दहाव्या मजल्यापर्यंत पोहोचली. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलंय. सुदैवानं या आगीत कुठलीही जीवितहानी झाली नाही.

हेही वाचा :

  1. धावती शिवशाही बस जळून खाक; चालकाच्या प्रसंगावधानाने 25 प्रवासी सुखरूप
  2. पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या गोदामाला भीषण आग, 6 जणांचा होरपळून मृत्यू
  3. Mumbai Building Fire : कांदिवलीमधील पवनधाम वीणा संतूर इमारतीला आग; दोघांचा मृत्यू
  4. Bengaluru Godown Fire : बेंगळुरूमध्ये फटाक्यांच्या गोदामाला भीषण आग, ११ जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.