ETV Bharat / state

Maharashtra Political Crisis : दौऱ्याची सुरुवात करण्यास नाशिकच का निवडले, शरद पवारांनी पत्रकार परिषदेत केला खुलासा - शरद पवार यांचे जंगी स्वागत

शरद पवार यांचे नाशिकमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी शरद पवार यांनी अजित पवार यांच्यासह छगन भुजबळ यांच्यावरही भाष्य केले.

Maharashtra Political Crisis
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार
author img

By

Published : Jul 8, 2023, 2:17 PM IST

Updated : Jul 8, 2023, 3:10 PM IST

नाशिक : अजित पवार यांनी राष्ट्रवादीत बंड पुकारल्यानंतर शरद पवार यांनी महाराष्ट्राचा दौरा सुरू करण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शरद पवार यांनी आज नाशिक गाठले. यावेळी त्यांनी आपल्या दौऱ्याची सुरुवात नाशिकपासून का केली, याचा खुलासा केला. शरद पवार यांनी नाशिकला पोहोचताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शरद पवार यांचे जंगी स्वागत केले. नाशिकमध्ये पोहोचताच शरद पवार यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी छगन भुजबळ यांच्यावरही भाष्य केले.

पवारांची पहिली सभा भुजबळांच्या बालेकिल्ल्यात : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार यांचे दौरे सुरू झाले आहेत. शरद पवारांची पहिली सभा छगन भुजबळांच्या बालेकिल्ल्यात होत आहे. ज्यांनी पवारांची साथ सोडली त्याच्या मतदारसंघात जाऊन शरद पवार बंडखोरांना आव्हान देत आहेत. तसेच मतदारांना देखील राष्ट्रवादीची भूमीका स्पष्ट करुन सांगत आहे. मात्र, शरद पवारांनी भुजबळांचा मतदारसंघ का निवडला याची जोरदार चर्चा सध्या सुरू आहे.

भुजबळांनी घड्याळाचे काटे फिरवले : अजित पवारांनी आठ दिवसांपूर्वी बंडखोरी केल्याने राष्ट्रवादी पक्षात मोठी फुट पडली आहे. तसेच त्यांनी 40 आमदारांचा पाठिंबा असल्याचे म्हटले आहे. एकीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवारा असे दोन गट पहायला मिळत आहे. मात्र, यात शरद पवारांच्या जवळचे अत्यंत विश्वासु नेते आमदार छगन भुजबळ अजित पवार यांच्या गटात सामील झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शरद पवार तसेच छगन भुजबळ दोघेही शक्तिप्रदर्शन करत आज नाशिकमध्ये दाखल झाले. मंडल आयोगाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात शिवसेनेचा पराभव करणाऱ्या छगन भुजबळ यांनी आतापर्यंत तीन बंड केले आहेत. सोनिया गांधींच्या परकीय वादामुळे काँग्रेस सोडून भुजबळांनी शरद पवारांना हात दिला होता. त्यानंतर आत्ता त्यांनी शरद पवारांची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाचे काटे फिरवले आहे. शरद पवारांची घड्याळ त्यांच्या हातात असुन काटे मात्र, अजित पवारांच्या हातत आहेत.

भुजबळांना चितपट करण्याची नीती : 1999 मध्ये शरद पवार यांनी भुजबळांकडे महत्वाची जबाबदारी सोपवली होती. त्यात प्रदेशाध्यक्ष, गृहमंत्री, उपमुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते अशा पदांवर त्यांनी काम केले. तसेच अडीच वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर देखील भुजबळांना मंत्रिपद दिले, तरीही भुजबळांनी ओबीसीचा मुद्दा पुढे करत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळाचे काटे फिरवले आहेत. त्यांनी राष्ट्रवादीत बंडखोरी करीत भाजप-शिंदे सरकारमध्ये मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. त्यामुळे भुजबळांच्या बालेकिल्यात जाऊन भुजबळांना चितपट करण्याची नीती राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी केली आहे. येवला मतदार संघात भुजबळसलग चार टर्मपासून आमदार आहेत. आत्ता पवार त्यांना कसे चितपट करणार येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा - Maharashtra Political Crisis Update: वस्तुस्थिती मांडण्यासाठी राज्याबाहेर तीन ठिकाणी दौरे करणार-शरद पवार

Last Updated : Jul 8, 2023, 3:10 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.