ETV Bharat / state

विनयभंग करणाऱ्या तडीपार गुंडाचे ऑफिस गावकऱ्यांनी जाळले - गुंड

लोहोणेर गावातील तडीपार गुंड स्वप्नील निकम उर्फ मिरची भैय्याने काही दिवसांपूर्वी विधवा महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मिरची भैय्याचे ऑफिस पेटवून दिले.

विनयभंग करणाऱ्या तडीपार गुंडाचे ऑफिस गावकऱ्यांनी जाळले
author img

By

Published : Apr 23, 2019, 8:07 PM IST

नाशिक - जिल्ह्यातील लोहोणेर गावातील तडीपार गुंड स्वप्नील निकम उर्फ मिरची भैय्याने काही दिवसांपूर्वी विधवा महिलेचा विनयभंग केला. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मिरची भैय्याचे ऑफिस पेटवून दिले. तर तडीपार गुंडाला देवळा पोलीस अभय देत असल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे.

पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तालुक्यातील लोहणेर येथील पीडित महिलेच्या पतीचे एका वर्षापूर्वी निधन झाले असून मुली शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतात. ती महिला घरी एकटीच असते. ही संधी साधून स्वप्निल निकम उर्फ मिरची भैया काही दिवसापूर्वी पीडित महिलेच्या घरी गेला आणि शारीरिक सुखाची मागणी केली. या प्रकाराची माहिती महिलेने तिच्या कुटुंबीयांना दिली.

तेव्हा १७ एप्रिलला स्वप्निल मिरची भैया विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर आरोपी मिरची भैय्या गावातून पळून गेला. त्याचा शोध पोलीस घेत होते. मात्र, मिरची भैय्या पोलिसांना सापडत नसल्याकारणाने लोहोनेरच्या गावकऱ्यांनी मिरची भैय्याच्या ऑफिसची जाळपोळ करून पोलीस प्रशासनाचा निषेध व्यक्त केला. यावेळी झालेली गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला.

स्वप्निल निकम हा सराईत गुन्हेगार असून देवळा पोलीस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. त्याच्यावर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई करण्यात आली आहे. तडीपारीचे आदेश असतानाही त्याने आदेशाचा भंग करत विनयभंगासारखा गंभीर गुन्हा केला आहे.

Intro:नाशिक जिल्ह्यातील लोहोणेर गावातील तडीपार गुंड मिरची भैय्याचे ऑफिस संतप्त गावकऱ्यांनी जाळले मिरची भैय्या या गुंडाने काही दिवसापूर्वी विधवा महिलेचा विनयभंग केला होता अशा तडीपार गुडाला देवळा पोलिसच अभय देत असलाच्या स्थानिक ग्रामस्थाचा आरोप होत आहे

Body:देवळा तालुक्यातील लोहनेर या गावी स्वप्नील निकम उर्फ मिरची भैया या तडीपार गुंडावर कारवाई व्हावी यासाठी लोहनेर परिसरातील सर्वच स्तरावर या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात आला असून संतप्त गावकऱ्यांनी आज या मिरची भैय्याचे ऑफिस जाळले या घटनेमुळे गेल्या काहि दिवसापासून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार तालुक्यातील लोहणेर येथील पीडित महिलेच्या पतीचे एका वर्षापूर्वी निधन झाले असून मुली शिक्षणानिमित्त बाहेरगावी असतात सदर महिला ही घरी एकटीच असते ही संधी साधून स्वप्निल अशोक निकम उर्फ मिरची भैया काही दिवसापूर्वी पीडित महिलेच्या घरी गेला व तिला बाहेर बोलावून शरीरिक सुखाची मागणी केली सदर प्रकाराची माहिती महिलेने तिच्या कुटुंबीयांना दिली असता 17 एप्रिल रोजी स्वप्निल मिरची भैया विरुद्ध देवळा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे त्यानंतर संशयित घटनास्थळा वरून प्रसार झालेला मिरची भैया याचा शोध पोलीस घेत आहेत संबंधित मिरची भैया हा गुंड पोलिसांना सापडत नसल्याकारणाने आज सकाळच्या सुमारास लोहोनेर ग्रामस्थांनी मिरची भैय्या ऑफिसची जाळपोळ करून पोलिस प्राशासनाचा निषेध व्यक्त केला यावेळी गर्दीला हटवण्यासाठी पोलीस प्रशासनाने नागरिकांवर लाठीचार्ज केला या वेळीस लोहणेर गावात तणावाचे वातावरण होते

Conclusion:स्वप्निल निकम हा सराईत गुन्हेगार असून देवळा पोलिस ठाण्यात त्याच्यावर अनेक गंभीर गुन्हे नोंद झाली आहे याच्यावर काही दिवसांपूर्वी तडीपारीची कारवाई झाली असून देवळा पोलिसांनी त्याला विसरवाडी जिल्हा नंदुरबार पोलीस स्टेशन हद्दीत सोडले होते तरीही त्याने तडीपारीचे आदेश भंग करून काही दिवसांपूर्वी लोहणेर येथील घरी जाऊन महिलेचा विनयभंगा सारखा गंभीर गुन्हा केला
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.