ETV Bharat / state

नाशिकमध्ये पुन्हा 'भगवा'च; हेमंत गोडसे विजयी, समीर भुजबळांचा पराभव - Nashik Lok sabha constituency

नाशिक लोकसभा मतदारसंघामध्ये शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांचा पराभव केला.

चौरंगी लढतीत कोण उधळणार गुलाल?
author img

By

Published : May 23, 2019, 6:36 AM IST

Updated : May 23, 2019, 5:24 PM IST

नाशिक - लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार हेमंत गोडसे हे विजयी झाले आहे. त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार समीर भुजबळ यांचा पराभव केला. यंदाची नाशिक लोकसभा निवडणूक शिवसेनेचे हेमंत गोडसे, राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ, वंचित बहुजन आघाडीचे पवन पवार आणि अपक्ष माणिकराव कोकाटे यांच्यामध्ये 'चौरंगी' अशी झाली होती. त्यामध्ये हेमंत गोडसे यांनी बाजी मारली आहे.

LIVE UPDATE -

  • 3:30 - शिवसेनेचे हेमंत गोडसे 85 हजार मतांनी आघाडीवर
  • 2:30 - सहावी फेरी: शिवसेनेचे हेमंत गोडसे 50 हजार मतांनी आघाडीवर
  • 1:00 शिवसेनेचे हेमंत गोडसे 32 हजार मतांनी आघाडीवर
  • 11:30 - तिसरी फेरीः शिवसेनेचे हेमंत गोडसे 24 हजार मतांनी आघाडीवर तर समीर भुजबळ पिछाडीवर
  • 11:00 - दुसरी फेरीः शिवसेनेचे हेमंत गोडसे 15 हजार मतांनी आघाडीवर तर समीर भुजबळ पिछाडीवर
  • 08:40 - हेमंत गोडसे आघाडीवर

नाशिक - लोकसभा मतदारसंघाच्या मतमोजणीला सेंट्रल वेअर हाऊस गोडाऊनमध्ये सुरूवात झाली आहे. या गोडावून परिसरात सुरक्षेच्या दृष्टीने चोख बंदोबस्त ठेवण्याता आला आहे. नाशिक लोकसभा मतदारसंघातून यंदा आघाडीकडून राष्ट्रवादी माजी खासदार समीर भुजबळ, भाजप-शिवसेना युतीकडून खासदार हेमंत गोडसे, वंचित बहुजन आघाडीकडून माजी नगरसेवक पवन पवार तर भाजपचे बंडखोर आमदार माणिकराव कोकाटे यांनी अपक्ष निवडणूक लढवली होती. यामुळे ही निवडणूक चौरंगी झाली आहे. या रणांगणात कोण बाजी मारणार हे येत्या काही तासात स्पष्ट होईल.

नाशिक लोकसभा मतदारसंघातील चौरंगी लढतीत यंदा प्रमुख पक्षातील एक खासदार, एक माजी खासदार, एक माजी आमदार, एक माजी नगरसेवक आपले नशीब आजमावत आहेत. मात्र, या निवडणुकीत युतीचे उमेदवार विद्यमान खासदार हेमंत गोडसे यांच्यासमोर राष्ट्रवादीने 2009 च्या लोकसभेचे विजयी उमेदवार समीर भुजबळ यांना उमेदवारी दिली. तसेच या मतदारसंघात वंचित फॅक्टर कितपत यशस्वी ठरणार हेही काही तासानंतर कळेल. मात्र, हेमंत गोडसे आणि समीर भुजबळ यांच्यातील लढत चुरसीची मानली जात आहे.

नाशिकमध्ये उमेदवाराची पात्रता, प्रचाराचे मुद्दे, विकासाची धोरणे यासोबतच जात आणि धर्म हा निकष देखील महत्वाचा मानला जात आहे. हे आजवर झालेल्या निवडणुकीतून समोर आले आहे. 2014 च्या निवडणुकीत नाशिक लोकसभा मतदारसंघात 58.83 टक्के इतके मतदान झाले होते. तर यंदाच्या 2019 च्या लोकसभेत 59.43 टक्के मतदान झाले आहे. यंदाच्या निवडणुकीत मतदानाच्या टक्केवारीमध्ये किंचीत वाढ झाल्याचे पाहायला मिळाले.

नाशिकमध्ये पक्षीय बलाबल -
नाशिक लोकसभा मतदारसंघ 6 विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. यात 3 जागा भाजप, 2 जागा सेना तर 1 जागा काँग्रेसकडे आहे. नाशिकमध्ये काही भागातील एकगठ्ठा मतदान हे निर्णायक ठरणार आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : May 23, 2019, 5:24 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.