ETV Bharat / state

नाशिक : गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

काल रात्री इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे कामगार आणि उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे. वनविभागाने यासंदर्भात तत्काळ कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Leopard sightings in Gonde midc in nashik
नाशिक : गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
author img

By

Published : Jun 25, 2021, 4:09 PM IST

नाशिक - गेल्या काही दिवसांपासून शहरी भागामध्ये बिबट्याचा वावर मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे. दरम्यान, काल रात्री इगतपुरी तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीमध्ये बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे कामगार आणि उद्योजकांमध्ये खळबळ उडाली आहे.

बिबट्याचे दर्शन

नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण -

मागील काही दिवसांपासून नाशिक जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी बिबट्यांचा वावर वाढला आहे. यात वडीवरे, भगूर, इगतपुरीनंतर आता गोंदे एमआयडीसीमध्ये काल रात्री बिट्याचे दर्शन झाले आहे. इगतपुरी तालुक्यातील गोंदे या औद्योगिक वसाहतीमध्ये रात्रीच्या वेळीदेखील अनेक कंपन्यांमध्ये काम चालते. तसेच आता भातशेतीचा हंगाम जवळ आल्यामुळे या ठिकाणीदेखील नागरिकांचा वावर असतो. अशातच या परिसरात बिबट्याचे दर्शन झाल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली आहे. गोंदे औद्योगिक वसाहत नाशिक-मुंबई महामार्गालगत असल्यामुळे या महामार्गावरून जाणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दोन दिवसांपूर्वी बिबट्याचा हल्ल्यात 3 वर्षीय मुलीचा मृत्यू -

दरम्यान, दोन दिवसांपूर्वी नाशिकच्या इगतपुरी तालुक्यातील कानडवाडी भागात राहणाऱ्या खडके कुटुंबातील गौरी गुरुनाथ खडके (3) ही मंगळवारी 22 जूनच्या रात्री घरच्या दाराजवळ आईच्या शेजारी बसली असताना अचानक बिबटयाने हल्ला करून तिला जवळच असलेल्या जंगलाच्या दिशेने ओढत नेले होते. ही सर्व घटना मुलीचे आई, वडील, आजोबा यांच्या समक्ष घडली असता त्यांनी आरडा ओरडा केल्याने व त्याचा पाठलाग केल्याने बिबट्याने काही अंतरावर झुडपात मुलीला सोडून जंगलाच्या दिशेने धूम ठोकली. मात्र, या घटनेत गौरी गंभीर जखमी झाली. या हल्ल्यात तिच्या मानेला खोलवर जखमा झाल्याने तिला ग्रामस्थांनी व वन कर्मचारी यांनी तत्काळ घोटी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. मात्र, काही तासातच उपचारादरम्यान गौरीचा मृत्यू झाला होता.

नाशिकचे निफाड, सिन्नर, इगतपुरी बिबट्याचे हॉटस्पॉट-

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर, निफाड, इगतपुरी, चांदवड हे तालुके बिबट्याचे हॉटस्पॉट म्हणता येईल. या तालुक्यातून गोदावरी, दारणा आणि कादवा या नद्या प्रवाहित होत असून या नद्यांच्या आजुबाजूला उसाचे मोठे क्षेत्र आहे. अशात बिबट्यांना लपण्यासाठी उसाचे शेत ही सुरक्षित जागा असल्याने बिबट्याच्या वावर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात असतो. या सोबत मुबलक पाणी आणि गावात भक्ष्य म्हणून बिबट्यांना शेळ्या-मेंढ्या तसेच भटकी कुत्री मिळत असल्याने बिबट्यांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. वनविभागाच्या एका सर्वेक्षणानुसार नाशिक जिल्ह्यात जवळपास 200 हून अधिक बिबटे असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा - भाजपासारख्या पक्षाने सुडाचे राजकारण करणं दुर्दैवी - खासदार सुप्रिया सुळे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.