नाशिक - नाशिकच्या सिन्नर तालुक्यात दोन दिवसापूर्वी दोन बिबट्यांचा नारळाच्या झाडावर थरार बघायला ( Thrilling Leopard fight ) मिळाला. आता याच भागात एक बिबट्या चक्क निलगिरीच्या झाडावर चढतांनाचा व्हिडीओ मोबाईलमध्ये कैद झाला ( Leopard on eucalyptus tree ) आहे. बिबट्याच्या या परिसरात असलेल्या वावरमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून वन विभागांना ठिकठिकानी पिंजरा ( fear atmosphere among farmers )लावला आहे.
बिबट्यांच्या झुंजीचा थरार - नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील सांगवी गावात दोन दिवसांपूर्वी घुमरे कुटुंबियांच्या नारळाच्या झाडावरती दोन बिबट्यांच्या झुंजीचा थरार बघण्यास ( Leopard fight on coconut tree ) मिळाला. हे दोन्ही बिबटे नारळाच्या झाडावरती भांडण करत, डरकाळी फोडत वर्चस्व निर्माण करत असल्याचा व्हिडिओ स्थानिक नागरिकांनी मोबाईल कॅमेरात कैद केला होता. आता याच भागात दुपारच्या सुमारास एक बिबट्या चक्क निलगिरीच्या झाडावर स्वारी करताना दिसून आला. स्थानिक नागरिकांनी हा व्हिडिओ मोबाईल मध्ये कैद ( Leopard climbing eucalyptus tree Video ) केलाय.
पालक विद्यार्थ्यांना शाळेत पाठवेनात - गेल्या आठ दिवसापासून या भागात नागरिकांना सातत्याने बिबट्याचे दर्शन होत असून यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. जोपर्यंत दोन बिबटे जेरबंद होत नाही तोपर्यंत मुलांना शाळेत न पाठवण्याचा पवित्रा काही पालकांनी घेतल्याचे सांगण्यात येते आहे. दोन दिवसापासून वन विभागांना या ठिकाणी दोन पिंजरे लावले असून अद्याप बिबट्या जेरबंद न झाल्यामुळे दिवसेंदिवस नागरिकांमध्ये चिंता वाढत आहे.