ETV Bharat / state

Leopard Caught : धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद - बिबट्याला अखेर जेरबंद

नाशिकरोडच्या जयभवानी रोड परिसरात मागील सात तासांपासून दहशत निर्माण करणार्‍या बिबट्याला अखेर जेरबंद ( Leopard Caught ) करण्यात विभविभागाला यश आले ( Forest Department of Nashik ) आहे. मोठ्या शिताफिने बिबट्याला पिंजर्‍यात अडकवल्यानंतर परिारातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

बिबट्या
बिबट्या
author img

By

Published : Jan 31, 2022, 5:38 PM IST

नाशिक - नाशिक रोड परिसरातील जय भवानी रोड परिसरात सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास नागरिकांना बिबट्याचे दर्शन झाले होते. थेट सोसायटीच्या पार्किंगमध्ये बिबट्याने हजेरी लावल्याने ही खबर परिसरात वार्‍यासारखी पसरली. यानंतर स्थानिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना बिबट्याबाबत माहिती दिली. दरम्यान, वन विभागाने ( Forest Department of Nashik ) रेस्क्यू ऑपरेशन करत सात तासांत बिबट्याला जेरबंद केले ( Leopard Caught ) आहे. यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला.

धुमाकूळ घालणारा बिबट्या अखेर जेरबंद

के जे मेहता हायस्कूल परिसरात असलेल्या एका घराच्या आवारात असलेल्या गाडीखाली बिबट्या लपला होता. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व नागरिकांना बघताच बिबट्या तेथून बाहेर निघाला. त्यानंतर तो एका बंगल्यात चालत गेला. याच दरम्यान या बिबट्याने क्षत्रिय नावाच्या एका व्यक्तीवर हल्ला केला. घटनास्थळी उपनगर पोलीस वनविभागाचे कर्मचारी यांना बिबट्याला पकडण्यासाठी बरेच परिश्रम घ्यावे लागले. पण, बिबट्या हाती लागत नव्हता. या घटनेनंतर नागरिकांची प्रचंड गर्दी झाल्याने पोलिसांना व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गर्दी हटवणे मुश्कील झाले होते. त्यामुळे बिबट्या हा घाबरून एका बंगल्यातून दुसऱ्या बंगल्यात उड्या मारत जात होता.

भरवस्तीत बिबट्या घुसल्यामुळे घरातील नागरिक महिला व लहान मुले घाबरलेल्या अवस्थेत होते. दरम्यान, त्यानंतर याच परिसरात राहणाऱ्या अॅड. सोमनाथ गायकवाड यांच्या बंगल्यातील आवारात असलेल्या चारचाकी वाहनाखाली (क्र. एम एच 15 ए एच 4840 ) लपला. तत्पूर्वी घरात राहणाऱ्या संगीता गायकवाड यांच्यावरही सदर बिबट्याने झडप मारण्याचा प्रयत्न केला. पण, गायकवाड यांनी प्रसंगावधान राखून स्वतःला बिबट्याचा हल्ल्यातून वाचवले. दरम्यान, या घटनेनंतर वनविभागाचे कर्मचारी उपनगर पोलीस व स्थानिक नागरिक यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. वाहनाच्या चारही बाजूने जाळ्या टाकून बिबट्याला बेशुद्ध होणारे इंजेक्शन ( डार्ट ) देऊन जेरबंद ( Leopard Caught ) केले. बिबट्याला जेरबंद करताच त्याला बघण्यासाठी प्रचंड गर्दी जमली होती.

उपचारासाठी सुरक्षितस्थळी रवाना - बिबट्या बेशुद्ध झाल्यानंतर वन विभागाने ( Forest Department of Nashik ) स्थानिकांच्या मदतीने बिबट्याला जेरबंद ( Leopard Caught ) केले. त्यानंतर बिबट्याला पुढील उपचारासाठी सुरक्षितस्थळ रवाना करण्यात आले आहे. बिबट्याचे वय अंदाजे चार वर्षांच्या पुढील असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी भदाणे यांनी दिली.

हेही वाचा - Leopard Catch by Forest Department : येवल्यातील बदापूरला मादी बिबट्या जेरबंद; 15-20 दिवसातील दुसरी कारवाई

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.