नाशिक - जिल्ह्यातील शिंगवे दारणा परिसरात एका ४ वर्षीय मुलीवर बिबट्याने हल्ला केल्याची घटला घडली. तिच्या आजीच्या प्रसंगावधानाने तिचा जीव वाचला. मात्र, परिसरात बिबट्याची दहशत कायम आहे.
सध्या नाशिक शहरात बिबट्याचा वावर असून नाशिकच्या वेगवेगळ्या भागात बिट्याचे दर्शन होत आहे. नाशिकच्या इंदिरा नगर भागात बिबट्याने हल्ला केल्याची घटना ताजी असताना नाशिक जवळच्या शिंगवे दारणा परिसरात हल्ल्याची घटना घडली. आपल्या नातीसाठी प्राणाची बाजी लावत बिबट्याच्या हल्ल्यातून आजीने आपल्या 4 वर्षाच्या नातीला वाचविले आहे. नाशिकच्या शिंगवे दारणा येथील समृद्धी कासार या 4 वर्षाच्या चिमुरडीवर बुधवारी रात्री बिबट्याने अचानक हल्ला केला. पण जवळच बसलेल्या आजी भद्राबाई यांनी प्रसंगावधान राखत बिबट्याला पळवून लावले. या घटनेत समृद्धीच्या डोक्याला जखम झाली असून तिला पळसे येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मुलीची प्रकृती आत्ता उत्तम असून शूरवीर आजीबाईंचं मात्र सर्वत्र कौतुक केले जाते आहे.