ETV Bharat / state

कोरोनाचा फटका कांदा बाजारपेठांनाही, आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ बंद

लासलगाव बाजारपेठेत आज कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले. मात्र, यानंतर सरकारी आदेश येईपर्यंत लिलाव बंद राहणार असल्याची माहिती समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली.

कोरोनाचा फटका कांदा बाजारपेठांनाही
कोरोनाचा फटका कांदा बाजारपेठांनाही
author img

By

Published : Mar 23, 2020, 5:16 PM IST

नाशिक - कोरोनाच्या पार्शवभूमीवर जिल्ह्यासह शहरातदेखील अनेक व्यवसाय बंद करण्यात आले आहेत. असे असतानाच, आशिया खंडातील कांद्याची मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱ्या लासलगाव कृषी उत्त्पन्न बाजार समितीतील व्यवहारही आज(सोमवार) बंद करण्यात आले आहेत.

कोरोनाचा फटका कांदा बाजारपेठांनाही

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर विविध उपाययोजना करण्यात येत आहे. खबरदारीचा पर्याय म्हणून प्रशासनाने राज्यात कलम १४४ (जमावबंदी) लागू केली आहे. शासनाच्या आदेशाचे पालन करत लासलगाव बाजारपेठेत आज कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले. दरम्यान लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत सरकारी आदेश येईपर्यंत लिलाव बंद राहणार असल्याची माहिती समितीच्या सभापती सुवर्णा जगताप यांनी दिली. मात्र, अत्यावश्यक सेवा बघता बाजार समिती सुरू ठेवता येईल का, याबाबत समिती प्रशासन सरकारशी चर्चा करणार असल्याची माहिती आहे.

हेही वाचा - कोरोना इफेक्ट : रस्त्यावर होणारी गर्दी रोखण्यासाठी पोलिसांची ठिकठिकाणी नाकेबंदी

हेही वाचा - कोरोना परिणाम: दिंडोरीमधून गुजरातला जोडणाऱ्या मार्गाने २४ तासात एक दुधगाडी रवाना

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.