नाशिक - लासलगाव बाजार समिती कांदा लिलावात महिला संस्था सहभागी होताचे व्यापाऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. लासलगाव येथील स्थनिक व्यापारी असोसिएशनचे सभासद नाही म्हणून लिलावात सहभागी होता येणार नाही, अशी भूमिका स्थनिक व्यापाऱ्यांनी घेतली मात्र महिला व्यापाऱ्यांकडून अशा प्रकारे विरोध होत असल्याने कृषी साधना संचालिका साधना जाधव यांनी नाराजी व्यक्त केली आहे.
आशिया खंडातील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचे नाव लौकिक आहे. मात्र, या बाजार समितीच्या अध्यक्षा महिला असून सुद्धा इथं महिला व्यापाऱ्यांना गलिच्छ वागणूक देण्यात आली. कृषी साधना महिला सहकारी संस्थेच्या संचालिका साधना जाधव या नवी दिल्ली येथील एफको संस्थेच्या पहिल्या महिला संचालिका असून विंचूर विकास सोसायटीच्या अध्यक्षा असलेल्या आहे. जाधव यांना नाफेडच्या वतीने कांदा खरेदीचे टेंडर मिळूनही लासलगावच्या स्थानिक व्यापाऱ्यांनी पुरुषी मानसिकता आणि व्यापारी मक्तेदारीचे दर्शन घडवले. बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी बोटचेपी भूमिका घेत व्यापार्यांना शरण जाणे पसंत केलं.
लासलगाव बाजार समितीतील व्यापाऱ्यांच्या मक्तेदारीचा हा पहिला प्रसंग नाही, कांदा खरेदीचा परवाना बाजार समिती देते. मात्र, व्यापारी असोसिएशनच्या सभासद नसल्याचे घटनाबाह्य कारण पुढे करून त्यांना लिलावात सहभागी होऊ दिले जात नसल्याचे चित्र आहे. त्याचा फटका कृषीसाधना उत्पादक महिला सहकारी संस्थेला गुरुवारी बसला, या संस्थेला नाफेडच्या वतीने कांदा करण्याचे काम मिळाले आहेत, कांदा खरेदी विक्रीचा परवानाही संस्थेकडे आहे. विंचूर बाजार समिती संस्था कांदा खरेदी करते, मात्र लासलगाव बाजार समितीचे कांदा खरेदीसाठी महिला संस्था सहभागी होताचं स्थनिक व्यापार्यांनी लिलाव बंद पाडला, संस्था ही लासलगाव कांदा व्यापारी असोसिएशन सभासद नसल्याचं कारण देण्यात मात्र असोसिएशनचे सभासद असलेल्यांना लिलावात सहभागी होता येईल, असा कोणताही नियम नसल्याने यामागे लासलगावच्या व्यापाऱ्यांची पुरुषी मनोवृत्ती पुढे आली आहे.
वेदनादायी चित्र -
नाफेड सारख्या राष्ट्रीय संस्थेने ग्रामीण भागातील छोट्या संस्थेला कांदा खरेदी करण्याची परवानगी दिलेली आहे. आम्ही लिलाव प्रक्रियेत सहभागी होतो, त्यावेळी निश्चितच शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो, आम्ही पहिल्यांदाच कांदा खरेदी करीत असताना विंचूर येथे लिलावात सहभागी होण्यासाठी परवानगी मिळते. मात्र, लासलगाव येथील स्थानिक व्यापारी आम्ही असोसिएशनचे सभासद नाही, या कारणाने लिलाव सोडून निघून जातात, हे कोणत्या कायद्यात बसते. महिलांच्या संस्थेला अशा प्रकारे पुरुष व्यापाऱ्यांकडून विरोध होत असेल तर निश्चितच वेदनादायी आणि लासलगाव बाजार समितीला शोभणारे नाही, असे मत कृषीसाधना संस्थेच्या संचालिका साधना जाधव यांनी व्यक्त केलं.