ETV Bharat / state

भाजपमध्ये बहुजन नेत्यांवर अन्याय होतो - एकनाथ खडसे

भाजप पक्षात काही प्रमाणात बहुजन नेत्यांवर अन्याय होतं असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. मुबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे जळगावकडे जाताना त्यांचे ठिकठिकाणी राष्ट्रवादी पदाधिकारी आणि खडसे समर्थकांनी जोरदार स्वागत केले.

eknath khadse
एकनाथ खडसे - राष्ट्रवादी नेते
author img

By

Published : Oct 24, 2020, 7:33 PM IST

नाशिक - भाजप पक्षात काही प्रमाणात बहुजन नेत्यांवर अन्याय होतं असल्याचे मत राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी नाशिकला आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले आहे. मुंबई येथे राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर खडसे यांनी नाशिकला येऊन राष्ट्रवादीच्या स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या भेटी घेतल्या. यावेळी खडसे यांचे छगन भुजबळ यांच्या बालेकिल्ल्यात जोरदार स्वागत करण्यात आले.

एकनाथ खडसे - राष्ट्रवादी नेते

हेही वाचा - देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागण; झाले क्वारंटाईन

खडसेंचे नाशिकमध्ये राष्ट्रवादीकडून स्वागत

मुबई येथे राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे जळगावकडे जाताना त्यांचे ठिकठिकाणी राष्ट्रवादी पदाधिकारी आणि खडसे समर्थकांनी जोरदार स्वागत केले. यावेळी त्यांनी पत्रकार परिषद घेत भाजपच्या नेत्यांचा चांगलाच समाचार घेतला. मी राष्ट्रवादीत प्रवेश केल्यानंतर अनेक भाजपचे आमदार माझ्या संपर्कात असून, ते देखील राष्ट्रवादीत येण्यास इच्छुक आहेत. मात्र, पक्ष बंदी कायद्यामुळे अनेकांना अडचणी येत आहेत. मात्र, येणाऱ्या निवडणुकीत उत्तर महाराष्ट्राचे चित्र वेगळे राहील, असेही खडसे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांना कोरोनाची लागत झाली असून, ते लवकरच यातून बरें व्हावे, अशा शुभेच्छा खडसे यांनी फडणवीस यांना दिल्या आहे.

भाजपमध्ये ओबीसी नेत्यांवर अन्याय होतो

भाजप पक्षात मी चाळीस वर्षे काम केले. त्यावेळी भाजप पक्षाची ओळख शेठजी, भडजी पक्ष म्हणून होती. त्यावेळी माझ्यासह गोपीनाथ मुंडे, ना स फरांदे, आण्णा डांगे यांच्यासह अनेकांनी कष्ट घेऊन पक्ष मजबूत करण्यास प्रयत्न केला. त्यावेळी भाजप हा बहुजनांचा चेहरा आहे हे आम्ही दाखवून दिले. मात्र, 2014 मध्ये बहुजनांचा मुख्यमंत्री झाला, असे वक्तव्य केले होते. तेव्हापासून माझ्यावर खोटे आरोप करण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे भाजपमध्ये काही प्रमाणात बहुजनांकडे दुर्लक्ष होते असल्याचे मला वाटत असल्याचे मत एकनाथ खडसे यांनी व्यक्त केले.

चंद्रकांत पाटील पक्षात येणाऱ्या नेत्यांना चॉकलेट-गोळ्या देतात वाटतं

एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादीने चॉकलेट देऊन पक्षात घेतले, असे वक्तव्य भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी केले होते. यावर एकनाथ खडसे यांनी उत्तर देताना म्हटले की, आतापर्यंत अनेक पक्षातील नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हा पाटील यांनी त्यांना चॉकलेट, गोळ्या दिल्या का? असा सवाल खडसे यांनी पाटलांना विचारला. मला राष्ट्रवादीत एक कार्यकर्ता म्हणून राहायला आवडेल, असेही खडसे यावेळी म्हणाले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.