नाशिक: इंद्रजाल ही एक प्रकारची सागरी वनस्पती आहे, ज्याच्या आत चमत्कारिक शक्ती लपलेल्या असतात असे सांगितले जाते. या वनस्पती मुळे आजूबाजूची नकारात्मक ऊर्जा निघुन घरात सकारात्मक ऊर्जा आणण्यास या मदत होते. ती चित्राप्रमाणे फ्रेम करून मुख्य दरवाजाच्या आत भिंतीवर लावावी असे सांगितले जाते. त्यामुळे वाईट शक्तींपासून रक्षण होते. साधी दिसणारी ही सागरी वनस्पती तुमची मानसिक शक्तीही वाढवते. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीकोनातून ही वनस्पती अत्यंत पवित्र मानली जाते.
वाईट नजर आणि वास्तू दोष दूर करण्यासाठी हे त्वरित प्रभावाने कार्य करते अशी मान्यता आहे. नकारात्मक उर्जेसोबतच ही वनस्पती काळ्या जादूच्या प्रभावापासूनही संरक्षण करते. समुद्रातून मिळालेल्या या तांत्रिक वनस्पतीमध्ये आध्यात्मिक शक्ती आहे. हे आजारपण, शत्रुत्व आणि व्यवसायाचे नुकसान टाळते. याला पूजेच्या घरात ठेवल्याने त्याची शक्ती आणखी वाढते. अशी मान्यता आहे.
इंद्रजाल वनस्पती ही तंत्र शास्त्रातील श्रेष्ठ वनस्पती म्हणून ओळखली जाते, मारण, मोहन, वश्मन स्तंभन उच्चाटन वशीकरण आदी अनेक तंत्र कामासाठी ती वापरली जाते, तसेच वास्तू मध्ये सुरक्षा प्राप्त व्हावी निगेटिव्हिटी निघून जावी, वास्तुदोष कमी व्हावे यासाठी इंद्रजाल वनस्पती वापरली जाते असे महंत अनिकेत देशपांडे यांनी सांगितले.
ही वनस्पती मुख्यत्वे करून समुद्रात सापडते, या वनस्पतीला पान नसतात तर फक्त छोट्या छोट्या एकमेकाला चिटकलेल्या फांद्या असतात. अतिशय दुर्मिळ अशा या वनस्पतीचे नित्यनियमाने पूजा केल्यास लगेच परिणाम दिसून येतात वैज्ञानिक भाषेत या वनस्पतीला सी फॅन म्हणतात तर काही ठिकाणी समुद्र फनी म्हणूनही संबोधले जाते. राष्ट्रवादी कॉग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या निवासस्थानच्या फोटोत घरातील भिंतीवर इंद्रजाल सारखी वनस्पती असलेली फ्रेम दिसते असे सांगितले जाते.