नाशिक - देवेंद्र फडणवीस यांनी पोलिसांना निधी दिलाच नाही. मात्र, जो निधी होता तो पळवून नेला, अशी टीका राज्याचे अन्न व नागरीपुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी भाजपवर केली आहे. त्यांच्या हस्ते भरोसा कक्ष आणि अत्याधुनिक पोलीस चौकीचे उद्घाटन करण्यात आले.
नागपूर आणि पुण्यानंतर आता महिला आणि बालकांच्या शोषणाविरूद्ध नाशिकमध्येही भरोसा सेल सुरू करण्यात आला आहे. पालकमंत्री छगन भुजबळ आणि पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या उपस्थितीत हा उद्घाटन सोहळा पार पडला. महिला आणि बालकांचे लैगिंक, मानसिक आणि आर्थिक स्वरुपाचे शोषण होते. यात बळी पडलेल्या महिला आणि बालकांना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी योग्य मार्गदर्शनासह मदत मिळत मिळावी, यासाठी भरोसा सेल हा कक्ष सुरू करण्यात आला आहे. त्यात पोलीस मदत, महिला हेल्पलाइन, समुपदेशन, वैद्यकीय सेवा, मानसोपचार तज्ज्ञ, विधीविषयक सेवा, पीडित महिलांचे पुनर्वसन, कौटुंबिक हिंसाचार कायद्यांतर्गत संरक्षण आदी पुरविण्यात येणार आहे.
हेही वाचा - 'एखाद्या नेत्याची भाटगिरी किती करावी याचे भान ठेवायला हवे'