येवला (नाशिक ): येवले शहरातील जुनी नगरपालिका रोड या ठिकाणी नेहमीच गटाराचे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील खराब पाण्यातून मार्ग काढत दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो. वारंवार तक्रारी केल्यानंतर त्या ठिकाणी एक पाईप टाकण्यात आला. मात्र व्यवस्थित पाईप न टाकल्याने परत गटार तुडुंब भरल्याने पाणी रस्त्यावर आले. नगरसेवक सचिन मोरे यांनी स्वच्छता विभागाकडे वारंवार तक्रार करून देखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने त्यांनी तुंबलेल्या गटारातील घाण स्थानिक तरुणांनाच्या मदतीने काढली. सचीन मोरे येवला नगरपालिकाचे नगरसेवक आहेत. जेव्हा त्यांनी तुंबलेल्या गटाराचे पाणी रस्त्यावर वहात असतांना पाहिले तेंव्हा त्यांनी पालिकेला संपर्क साधला केला. तेंव्हा त्यांना स्वछता विभागातील कर्मचारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मोरे स्वतःच गटार स्वच्छतेसाठी सरसावले. त्यात त्यांना स्थानिकांनीही मदत केली.
येवल्यात नगरसेवकच तुंबलेली गटार साफ करण्यासाठी सरसावतात तेव्हा - येवला नगरपरिषद बातमी
येवले शहरातील जुनी नगरपालिका रोड या ठिकाणी नेहमीच गटाराचे पाणी रस्त्यावर येत असते. त्यामुळे रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना रस्त्यावरील खराब पाण्यातून मार्ग काढत दुर्गंधीचा त्रास सहन करावा लागतो.