मनमाड - चारित्र्यावर संशय घेत पतीने पत्नीची धारदार शस्त्राने हत्या करत स्वतः आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर पतीला अधिक उपचारासाठी धुळ्याला रवाना केले आहे. मनमाड मधील हनुमान नगर येथे ही घटना घडली आहे.
मनमाड शहरातील हनुमान नगर येथील नामदेव श्यामराव आहिरे वय 50 याने पत्नी सुनीता नामदेव आहिरे वय 43 हिच्या चारित्र्यावर संशय तीक्ष्ण हत्याराने तिच्यावर गंभीर वार केले. यात उपचारादरम्यान तिचा मालेगाव येथे मृत्यु झाला. तसेच श्यामराव याने स्वतःदेखील आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यात तोही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर धुळे येथे उपचार सुरू आहे. मालेगाव ग्रामीणचे डीवायएसपी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत सहायक पोलिस निरीक्षक प्रल्हाद गीते यांना तपास करण्यासाठी सूचना केल्या आहे. मुलीच्या सांगण्यावरून श्यामराव यांच्याविरोधात मनमाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.
वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी भेट!
मनमाड शहरातील या घटनेची पोलीस प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. मालेगाव ग्रामीणचे डीवायएसपी शशिकांत शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी करत तपासासाठी आवश्यक सूचना केल्या आहे.या घटनेतील आरोपी हा दवाखान्यात उपचार घेत असून त्याची प्रकृती गंभीर असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.