मनमाड (नाशिक) - मनमाड शहर परिसरात आज पावसाचे जोरदार पुनरागमन झाले. सुरुवातीला हलक्या सरी कोसळल्या. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर वाढला. दोन तासापेक्षा जास्त वेळ पाऊस झाला. त्यामुळे गेल्या १५ दिवसांंपासून पावसाने दडी दिल्यामुळे करपू लागलेल्या पिकांना जीवदान मिळाले आहे.
दरम्यान, अचानक आलेल्या पावसाने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात कांदा विक्री करण्यासाठी आलेल्या शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली. कांदा झाकण्यासाठी शेतकऱ्यांंची धावपळ झाली. पावसाचे पुनरागमन झाले, मात्र जोरदार पावसाची सर्वांना प्रतीक्षा आहे.
मनमाड शहरासह नांदगाव तालुक्यातील ग्रामीण भागात देखील पावसाने जोरदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावला आहे. मात्र, अजून जोरदार पावसाची सर्वाना अपेक्षा आहे.