ETV Bharat / state

नाशिक जिल्ह्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत, बळीराजा सुखावला - त्र्यंबकेश्वर

नाशिकात मुसळधार पावसाचे आगमन झाले आहे. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. पावसामूळे जनजीवन विसकळीत झाले आहे. मात्र, या पावसाने शेतकरी सुखावला आहे.

शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचे दृष्य
author img

By

Published : Jul 1, 2019, 7:32 PM IST

नाशिक- जिल्ह्यात उशिरा मान्सून दाखल झाला असला तरी गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे. या पावसामूळे जनजीवन विस्कळीत झाले असले, तरी शेतकरीवर्गामधून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.

शहरात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचे दृष्य

शहरासोबतच जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, सिन्नर, चांदवड, पेठ, कळवण, सुरगाणा, मनमाड, नांदगाव, सटाणा आदी तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. आज सायंकाळच्या सुमारास २ तास झालेल्या मुसळधार पावसाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झाले होते. रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली होती. यासोबतच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती.

जोरदार पावसामूळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले. महिन्याभरापासून नाशिककर मान्सूनच्या प्रतीक्षेत होते. मात्र, जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने नागरिक पावसाची वाट पाहात होते. अशातच जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे.

Intro:नाशिक मध्ये मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत...

Body:नाशिक जिल्ह्यात उशिरा मान्सून दाखल झाला असला तरी गेल्या चार दिवसापासून नाशिक जिल्ह्यात ठिकठिकाणी पावसाची संततधार सुरू आहे,त्यामुळे शेतकऱ्यांन सोबतच नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे..
नाशिक शहरा जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी,सिन्नर ,चांदवड, पेठ,कळवण सुरगाणा,मनमाड, नांदगाव,सटाणा आदी तालुक्यात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली आहे..
आज सायंकाळच्या सुमारास 2 तास झालेल्या मुसळधार पावसाने काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालं होतं,रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचल्याने वाहनधारकांची तारांबळ उडाली, यासोबतच रस्त्याच्या कडेला व्यवसाय करणाऱ्यांनी आपली दुकाने बंद केली होती,तसेच जोरदार पावसामुळे अनेकांनी घरातच राहणे पसंत केले, महिन्याभरापासून नाशिककर मान्सूनच्या प्रतीक्षेत होते ,मात्र जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पावसाने दडी मारल्याने पाऊस कधी होईल याची ओढ सर्वांनाच होते, अशाच जुलै महिन्याच्या पहिल्याच तारखेला पावसाने जोरदार हजेरी लावल्याने सर्वत्र समाधानाचे वातावरण पसरले आहे....

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.