नाशिक : नाशिक : हनुमंतांचे सद्गुरु वेणाभारती महाराज स्थापित सिद्धपीठ, कपिकुल सिद्धपीठम या ठिकाणी रामायण कालीन पुरातन अशी स्वयंभू गरुड, हनुमानाची एकाच मूर्तीत आहे. आज हनुमान जयंतीनिमित्त या ठिकाणी भाविकांनी 26 राज्यातील प्रमुख विशेष पदार्थांचा नैवेद्य मनुमानाला दाखवण्यात आला. तसेच हनुमान जन्मोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले.
मनोकामना पुर्ण : पंचवटी येथील वेणाभारती महाराज स्थापित सिद्धपीठ कपिकुल सिद्धपीठम या ठिकाणी प्राचीन श्री हनुमंताची मूर्ती आहे. गरुड, हनुमान असलेली दुर्मिळ प्राचीन स्वयंभू मूर्ती आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिकला येणारे साधू सांगतात की, ही रामायण कालीन मूर्ती आहे. जेव्हा प्रभू राम पंचवटी भागात तपश्चर्या करत असत तेव्हा त्याचे रक्षण हनुमंत करत असत. या मूर्तीत हनुमंताच्या हातात गदा नसून कमळ आहे, गरुडाचे पंख आहेत, वेगळ्या प्रकारचा मुकुट आहे. काही वर्षापूर्वी या मूर्तीचा जीर्णोद्धार, वज्रलेप करण्यात येऊन या मूर्तीला नवरूप देण्यात आले आहे. ही जागृत मूर्ती असून या हनुमंताकडे कुठलीही मनोकामना मागितली तर, ती पूर्ण होते, अशी भाविकांची श्रद्धा आहे.
26 राज्यातील पदार्थ : महाराष्ट्र; पुरणपोळी, उत्तराखंड; डाळ खिचडी, कडी पकोडे, चंदीगड; छोले भटूरे' लस्सी, बिहार ; आलू चाट, जिलेबी , काश्मीर; केशर दूध, एप्पल खीर, पुलाव, गोवा; काजू करी, पेस्ट्री, अंदमान; मिक्स फ्रूट, राजस्थान; कचोरी, फरसाण, उत्तर प्रदेश; पुरी भाजी, रबडी, गुजरात; शेव टोमॅटो, दूध पाक, बंगाल; बंगाली मिठाई, अरुणाचल; टोमॅटो चटणी, फिंगर चिप्स, मणिपूर; सूप, सॅलेड, लडाख; मॅगी, केरळ; इडली, कर्नाटक; डोसा झारखंड ; मालपुवा त्रिपुरा; पालक पनीर
13 कोटी नामजप : यावर्षी अधिक महिना आल्यामुळे 13 महिन्यांचा कल्याण प्रद पुण्यप्रद 13 कोटी नामजप संकल्पाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमांचे आयोजन भक्तांसाठी सद्गुरु वेनाभारती महाराज यांनी केले आहे. एक वर्ष आपल्या घरी राहूनच हा जप करायचा आहे. सद्गुरू सांगतील त्या पद्धतीने जप केल्यास हा आपला 13 कोटी नामजप संकल्प एक वर्षात पूर्ण होण्याची दुर्लभ, अमृत संधी भक्तांना मिळणार आहे.