मालेगाव (नाशिक) : मालेगाव तालुक्यातील सौंदाणे येथे मनमाड-चोंढी रस्त्यालगत अर्धा किलोमीटर परिसरात 20, 50, 100 ते 2000 रुपयांच्या एका शेतात चुरगळलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ माजली. अचानक शेतात नोटा परलेल्या पाहुन शेतकऱ्यांमध्ये देखील शंका आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले.
हेही वाचा... #coronavirus : राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय; राज्याची विभागणी रेड, ऑरेंज आणि ग्रीन झोनमध्ये
या नोटा साधारण अर्धा किलोमीटरपर्यंत पसरलेल्या आढळून आल्या. सदर प्रकरणामुळे काही वेळ विविध अफवांना परिसरात ऊत आला होता. शेती कामासाठी शेतमजूर शेतात आले असता, त्यांना नोटा चुरगळलेल्या आणि ओल्या होऊन वाळत टाकलेल्या अवस्थेत दिसल्या. त्यांनी हा प्रकार इतर शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिला. त्यानंतर परिसराची पाहणी केली असता अर्धा किलोमीटरपर्यंत सगळीकडे नोटा विखुरलेल्या अवस्थेत आढळून आल्या.
करोना व्हायरचा प्रसार नोटांमधून देखील होतो, अशी शंका स्थानिक शेतकऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे ग्रामस्थांच्या मदतीने सर्व नोटा जमा करुन त्या जाळून नष्ट करण्यात आल्या.