नाशिक - किरकोळ कारणावरून मालेगावला रात्री गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. वाहन विक्री व्यवहारातील पैसे बाकी असल्याच्या कारणावरून गोळीबार झाल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
हेही वाचा - Silk Farming Nashik : शेतकऱ्याने सेंद्रिय शेतीतून साकारली आधुनिक 'रेशीम शेती'; वर्षाला मिळतोय भरघोष उत्पन्न
दुचाकी विक्रीच्या व्यवहारातून झालेल्या वादात रात्री एकावर गोळीबार झाल्याची घटना मालेगाव शहरातील आल्लमा एकबाल पुलावर घडली. याप्रकरणी किल्ला पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकी विक्रीच्या व्यवहारातील ४० हजार रुपये मिळाले होते, तर अन्य ३० हजार रुपये एकाकडे बाकी होते. पैसे मागण्यावरून दोघांमध्ये वाद झाला होता. या वादातून आरफात याने त्याच्या ताब्यातील बंदुकीने फिर्यादी वकार अली यांच्या दिशेने गोळी झाडली. सुदैवाने या गोळीबारात वकार बचावले. किरकोळ कारणावरून गोळीबार होत असल्याच्या अनेक घटना मालेगाव शहरात घडत असून याकडे पोलीस प्रशासनाने गंभीरपणे लक्ष देण्याची गरज आहे.
हेही वाचा - Argument of Hanuman Birthplace : शासकीय वेबसाइटनुसार अंजनेरी हेच हनुमानाचे जन्मस्थळ