ETV Bharat / state

गंजमाळ झोपडपट्टीत आगीतील नुकसानग्रस्तांना पालकमंत्र्यांच्या हस्ते मदत - guardian minister chhagan bhujbal

शहरातील गंजमाळ झोपडपट्टीमध्ये 25 एप्रिल रोजी गॅस सिलेंडरचा स्फोट झाला आहे. यात झोपडपट्टीतील 116 घरांचे मोठे नुकसाना झाले होते. त्या नुकसानग्रस्तांना नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडून मदत देण्यात येत आहे.

धनादेश वाटप करताना
धनादेश वाटप करताना
author img

By

Published : May 3, 2020, 3:07 PM IST

नाशिक - शहरात गंजमाळ झोपडपट्टीत 25 एप्रिल रोजी गॅस सिलेंडरच्या स्फोटामुळे लागलेल्या आगीत येथील ११६ घरांचे मोठे नुकसान झाले असून या नुकसानग्रस्त नागरिकांना नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते मदतीचे धनादेशाचे वाटप करण्यात आले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येऊन प्राथमिक स्वरूपात तीन नुकसानग्रस्त नागरिकांना त्यांच्या हस्ते मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले. उर्वरीत नुकसानग्रस्तांना घरपोच मदत देण्यात येणार असल्याचेही सांगितले.

मदत देताना पालकमंत्री छगन भुजबळ

नाशिकच्या गंजमाळ झोपडपट्टीत गॅस सिलेंडरच्या स्फोटात लागलेल्या भीषण आगीत ११६ घरांचे मोठे नुकसान झाले. या सर्व नागरिकांना शालिमार येथील बिडी भालेकर शाळेत त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली असून प्रशासनाच्या वतीने दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची मदत करण्यात येत आहे. आज नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या मदतीचे धनादेश वाटप करण्यात आले आहे. नुकसानग्रस्त ११६ नागरिकांना या धनादेशाचे वाटप करण्यात आली असून त्यांना काही अंशी दिलासा मिळणार आहे.

हेही वाचा - मालेगावमध्ये कोरोनाचा कहर सुरुच; जिल्ह्यातील 360 पैकी 324 रुग्ण मालेगावतील

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.