ETV Bharat / state

नैसर्गिक आपत्तीतूनही वाचवली द्राक्षे; बागलाणच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी - क्रिमसन सीडलेस द्राक्ष

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. याचा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागला.

grape growing farmers in nashik rescued grapes from natural disaster
बागलाणच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची प्रेरणादायी कहाणी
author img

By

Published : Dec 23, 2019, 12:42 PM IST

नाशिक - जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान अवकाळी पाऊस झाला. अवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्ष बागांचे अतोनात नुकसान झाले. याचा जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला. मात्र, अशा प्रतिकुल परस्थितीतही बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्रांनी मात्र नैसर्गिक आपत्तीवर मात केली. त्यांनी या अवकाळी संकटांशी दोन हात करत आपल्या मेहनतीच्या आणि कौशल्याच्या जोरावर तीन एकरातील द्राक्ष बागेला नुकसानीपासून वाचवले आहे.

नाशिकच्या बागलाण येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याने नैसर्गिक आपत्तीतूनही वाचवली द्राक्षे

हेही वाचा... अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर जोरदार हल्लाबोल; म्हणाल्या ‘ठाकरे’ नाव लावून...

भामरे यांनी आपली द्राक्ष बाग या आपत्तीतून फक्त वाचवली नाही. तर, जवळपास ३० टन निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून ३० ते ३१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळवण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांचे हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे आहे. तालुक्यात इतर शेतकऱ्यांच्या द्राक्ष बागांचे नुकसान झालेले असताना, भामरे यांची ही बहरलेली द्राक्ष बाग सध्या चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरत आहे. त्यांच्या या बागेला जिल्ह्यातील शेतकरी भेट देत असून त्यांचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा... विलेपार्ल्यात बहुमजली इमारतीला आग; अग्निशमन दल घटनास्थळी दाखल

नाशिकच्या बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी या छोट्याशा गावात सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्रांनी 'क्रिमसन सीडलेस' या नवीन वाण असलेल्या द्राक्षांची लागवड केली. योग्यवेळी औषध फवारणी करणे, देखभाल करणे यामुळे द्राक्षावर कोणतेही रोग पडून दिले नाहीत. तसेच या वाणामुळे पिकाच्या उत्पादनाचा एकरी खर्च देखील एक ते सव्वा लाख इतका कमी आहे. या बियाणामुळे शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचत असल्याचे भामरे यांनी सांगितले आहे.

हेही वाचा... 'तरुणांनो, मोदी-शाह यांनी तुमचे भविष्य उद्धवस्त केले.. भारताची विभागणी करुन द्वेषामागे लपण्याचा प्रयत्न'

Intro:नाशिक / सटाणा
जयवंत खैरनार (10025)
नाशिक जिल्ह्यात जुलै ते नोव्हेंबर दरम्यान वेळोवेळी झालेल्या अवकाळी पावसामुळे हंगामपूर्व द्राक्ष बागांचे जबरदस्त नुकसान झाल्याने येथील द्राक्ष पुर्णपण उध्वस्त झाला आहे. यात जिल्ह्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा आर्थिक फटका सहन करावा लागला आहे. अशा प्रतिकुल परस्थितीत बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी येथील द्राक्ष उत्पादक शेतकरी सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्राने नैसर्गिक संकटांशी दोन हात करीत वेळोवेळी आलेल्या आपत्तींवर मात करून आपल्या चिकाटी, कष्ट, मेहनत व कौशल्याच्या जोरावर अवघ्या तीन एकर वरील द्राक्ष बागेत जवळपास ३० टन निर्यातक्षम द्राक्ष उत्पादित करून ३० ते ३१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळविण्यात ते यशस्वी झाले आहेत. त्यांचे हे यश इतर शेतकऱ्यांना प्रेरणा देणारे असून "कोशिश करणे वालोंकी हार नही होतीl" हे यातून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. त्यांची हि बहरलेली द्राक्ष बाग सध्या चर्चेचा व आकर्षणाचा विषय ठरली आहे. या बागेस जिल्हाभरातील शेतकरी भेट देत असून त्यांचे कौतुक होत आहे.Body:बागलाण तालुक्यातील तांदुळवाडी या छोट्याशा गावात सुभाष भामरे व सचिन भामरे या पितापुत्राने 'क्रिमसन सीडलेस' हे नवीन वाण असलेले द्राक्ष लाऊन हि किमया साध्य केली आहे. 'क्रिमसन सीडलेस हि व्हरायटी बागलाण तालुक्यातील मोजक्या शेतकऱ्यांनी लागवड केली असून, कुज, गळ व क्र्याकिंग व अन्य रोगांना हे वाण सहसा बळी पडत नसल्याने याचा उत्पादन खर्च हि एकरी एक ते सव्वा लाख इतका कमी आहे. इतर द्राक्षांच्या फुगवनिसाठी जी. ए. सारखे माघडे औषध अत्यावशक असतांना या द्राक्षांसाठी त्याची आवश्यकता नसल्याने शेतकऱ्यांचा मोठा खर्च वाचत असल्याचे भामरे यांचे म्हणणे आहे. गडद लाल रंगातील हि द्राक्षे खाण्यासाठी गोड व रुचकर असल्याने विदेशात यास मोठी मागणी आहे.
Conclusion:सोबत फोटो व व्हिडीओ टाकलेत
सचिन भामरे या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याची मुलाखत आहे.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.