ETV Bharat / state

नाशिकमध्ये विहिरीत पडून आजोबा-नातवाचा मृत्यू; अपघात की घातपात याबाबत संभ्रम - 2 died in nashik latest news

भीमा किसन सांगळे (वय 65) हे  मंगळवारी त्यांचा नातू वैभव सुनील सांगळे (वय ३) याला घेऊन गावातील मळ्यात गेले होते. संध्याकाळ होऊन देखील दोघे घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्व नातेवाईकांकडे तपास करण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही.

dead granfather and grandson
मृत आजोबा आणि नातू
author img

By

Published : Dec 5, 2019, 12:11 PM IST

Updated : Dec 5, 2019, 12:58 PM IST

नाशिक - मनमाडपासून जवळ असलेल्या पानेवाडी येथील एक आजोबा आणि त्यांचा तीन वर्षांचा नातू मंगळवारी बेपत्ता झाले होते. बुधवारी रात्री एका विहिरीत त्यांचे मृतदेह आढळून आले आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

नाशिकमध्ये विहिरीत पडून आजोबा-नातवाचा मृत्यू

भीमा किसन सांगळे (वय 65) हे मंगळवारी त्यांचा नातू वैभव सुनील सांगळे (वय ३) याला घेऊन गावातील मळ्यात गेले होते. संध्याकाळ होऊनदेखील दोघे घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली. घरच्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. सर्व नातेवाईकांकडे तपास करण्यात आला. मात्र, त्यांचा शोध लागला नाही. सांगळे यांच्याकडे मोटरसायकल असल्याने ते नातेवाईकांकडे गेल्याचा अंदाज होता. मात्र, तपास करूनही त्यांच्याबद्दल कोणाकडून काहीच माहिती मिळाली नाही.

हेही वाचा - समाजवादी पक्षाचा 'खंडणीखोर' नेता औरंगाबाद पोलिसांच्या ताब्यात

मंगळवारी रात्रीही घरी न आल्याने बुधवारी त्यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते. गावाजवळील विहिरीत पाण्यावर तेलाचे तवंग दिसत असल्याने विहिरीत शोध घेतला असता भीमा सांगळे यांचा मृतदेह विहिरीत आढळून आला. तसेच मोटरसायकल देखील विहिरीत आढळून आली. मात्र, नातू वैभव याचा मृतदेह रात्री उशिरापर्यंत सापडला नव्हता. शोध कार्य सुरु होते. मोटरसायकलवरून घरी येत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने भीमा सांगळे थेट विहिरीत पडले असावेत, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, या घटनेने पानेवाडी गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत मनमाड पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे. तर मळ्यातून मोटरसायकलवर घराकडे निघालेले दोघे विहिरीत कसे पडले तसेच हा अपघात होता की घातपात याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.

Intro:ब्रेकिंग: मनमाड पासून जवळ असलेल्या पानेवाडी येथून काल पासून बेपत्ता असलेल्या   आजोबा व त्यांचा तीन वर्षांचा नातूचा मृतदेह आज रात्री एका विहिरीत आढळून आल्यामुळे एकच खळबळ उडाली असून मळ्यातून मोटारसायकलवर घराकडे निघालेले दोघे विहिरीत कसे पडले या बाबत उलट-सुलट चर्चा सुरू आहे.पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला

 Body:भीमा किसन सांगळे वय  65 हे  मंगळवारी  त्यांचा 3 वर्षाचा लहान नातू वैभव  सुनील सांगळे याला घेऊन गावातील मळ्यात गेले होते.संध्याकाळ होऊन देखील दोघे घरी न परतल्याने घरच्यांना काळजी वाटू लागली आणि त्यांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली सर्व नातेवाईकांकडे तपास करण्यात आला मात्र त्यांचा शोध लागला नाही. सांगळे यांच्याकडे  मोटारसायकल असल्याने ते नातेवाईकांकडे गेल्याचा अंदाज होता , मात्र तपास करूनही त्यांच्या बद्दल कोणाकडून काहीच माहिती मिळाली नाही मंगळवारी रात्रीही घरी न आल्याने बुधवारी त्यांचे कुटुंबीय व ग्रामस्थ त्यांचा शोध घेत होते, गावाजवळील विहिरीत पाण्यावर तेलाचे तवंग दिसत असल्याने विहिरीत शोध घेतला असता भीमा सांगळे यांचा मृतदेह विहिरीत सापडला , तसेच मोटारसायकल देखील विहिरीत आढळून आली, मात्र नातू वैभव याचा मृतदेह रात्री उशिरा पर्यंत सापडला नव्हताConclusion:शोध कार्य सुरू होते, मोटारसायकल वरून घरी येत असताना कठडा नसलेल्या विहिरीचा अंदाज न आल्याने भीमा सांगळे थेट विहिरीत पडले असावेत , असा प्राथमिक अंदाज आहे, दरम्यान शेतकरी कुटुंबातील आजोबांचा मृत्यू झाल्याने व नातवाचा तपास न लागल्याने पानेवाडी गावावर शोककळा पसरली आहे, या प्रकरणी रात्री उशिरा पर्यंत मनमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता .
आमिन शेख मनमाड
Last Updated : Dec 5, 2019, 12:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.