नाशिक - आई प्रतिष्ठानतर्फे राज्यस्तरीय ग्रामीण साहित्य संमेलन मालेगावात रविवारी २९ मार्चला आयोजित करण्यात आले आहे. संमेलनाध्यक्षपदी प्रसिद्ध विनोदी साहित्यिक डॉ संजय कळमकर यांची निवड करण्यात आली आहे. या संमेलनाचे उदघाटन कृषी मंत्री दादा भुसे यांच्या हस्ते तर स्वागताध्यक्ष पदाची धुरा महिला उद्योजिका निलिमा पाटील सांभाळणार असल्याची माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र दिघे यांनी दिली.
मालेगाव कॅम्प भागातील स्टार क्लबच्या मैदानावर पाच सत्रात हे संमेलन भरणार आहे. या वेळी प्रमुख अतिथी खासदार डॉ. सुभाष भामरे, आमदार डॉ.सुधीर तांबे, मविप्रचे अध्यक्ष डॉ तुषार शेवाळे, महापौर ताहेरा शेख, उपमहापौर निलेश आहेर,मामकोचे माजी अध्यक्ष राजेंद्र भोसले, जेष्ठ नेते सुरेश निकम, सुनील गायकवाड,बंडुकाका बच्छाव, सभापती सुवर्णा देसाई, उपसभापती सरला शेळके आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
ग्रंथदिंडीने सकाळी साडेआठला सुरूवात होईल. ग्रंथप्रदर्शनाचे उदघाटन झाल्यानंतर संमेलनाचे उदघाटन होईल. स्थानिक साहित्य सेवेचा कसमादे साहित्य भुषण पुरस्कार, उत्कृष्ट वाड्मय निर्मितीचा कुसुमाग्रज पुरस्कार, राजाराम भदाणे पुरस्कार, सुकदेव शेवाळे पुरस्कार, कुसुमताई सुर्यवंशी पुरस्कार, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
संमेलनाच्या दुसऱ्या सत्रात डॉ. पी.विठ्ठल यांच्या अध्यक्षतेखाली ' बदलते ग्राम व कृषीजीवन आणि मराठी कविता' या विषयावर परिसंवादात प्रा. डॉ. कैलास अंभुरे, प्रा. विदया सुर्वे- बोरसे आदी वक्ते सहभागी होतील. तिसऱ्या सत्रात चित्रकार,लेखक सरदार जाधव यांची प्रकट मुलाखत घेतली जाईल.चौथ्या सत्रात संजीवनी तडेगावकर यांच्या अध्यक्षतेखाली कविसंमेलनात प्रकाश होळकर, विजयकुमार मिठे, संजय बोरूडे, कमलाकर देसले, ऐश्र्वर्य पाटेकर, शोभा बडवे, ललीत अधाने, नारायण पुरी, रमजान मुल्ला,संदीप जगताप,विष्णू थोरे, दिनकर जोशी,रचना, डॉ प्रतिभा जाधव, सीमा सोनवणे, प्रा.राजेश्वर शेळके, विवेक उगलमुगले, सदाशिव सुर्यवंशी, विष्णू सुरासे, रमेश रावळकर, संजय वाघ, भास्कर निर्मळ, शरद धनगर, शफीक शेख, सुरेंद्र टिपरे आदी कविता सादर करतील. सुत्रसंचलन रविंद्र मालुंजकर व संतोष कांबळे करणार आहेत.
पाचव्या सत्रातील दुसऱ्या कविसंमेलनात कवी खलील मोमीन यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. एस. के. पाटील, राजेंद्र सोमवंशी, प्रशांत केंदळे,दयाराम गिलाणकर,गौरवकुमार आठवले, बाळासाहेब हिरे, संदीप देशपांडे,प्रमोद चिंचोले, जनार्दन देवरे,रविराज सोनार, निंबा निकम, काशिनाथ गवळी, किरण दशमुखे, सुभाष पवार, शुभांगी पाटील, संजय गोराडे, किरण भावसार, प्रदीप गुजराथी, नाना महाजन,तुषार शिल्लक, अशोक गायकवाड, सचिन गांगुर्डे, दुर्वास काळे, सुरेश औटे,वाल्मीक सोनवणे, हंसराज देसाई,प्रतिभा बोरसे, विवेक पाटील,जया नेरे, जनार्दन भोये, आदींसह नवोदित कवी सहभाग घेतील.सुत्रसंचलन राजेंद्र उगले व शिवदास निकम करणार आहेत.
संमेलनाच्या नियोजनासाठी विविध संस्थासह, आई प्रतिष्ठानचे सचिव गिरीश सुर्यवंशी,कार्यवाह सुमित बच्छाव, प्रविण शिंदे, सतिष मांडवडे, उमेश पवार,जितेंद्र सावंत,मधूकर शेवाळे, निवृत्ती सावंत, विश्वनाथ घोरपडे, निलेश नहिरे, रवींद्र जटीया, साहेबराव देवरे, नंदू अहिरे, छाया पाटील, लता सुर्यवंशी, सविता देवरे, दत्तात्रय भामरे, देविदास अहिरे, मनिषा सावळे, नुतन चौधरी, शामल पाटील, लक्ष्मण काळे, दिपक पाटील, भुषण कदम, शाम ठाकरे, परेश बडगुजर, मनोज पवार,योगेश बच्छाव, समिर मराठे, भाऊसाहेब कापडणीस, अभिजित देसले, मदन नाथबावा, संदीप पठाडे, वैजिनाथ भारती, ललीत कापडणीस, दिनेश निकम, विजय पवार, विशाल धिवरे, मोहन शेळके, आशा सोनवणे, सीमा कासार, जयश्री कापडणीस, विजया भदाणे, जयश्री गागरे, निलीमा देसले, विजया सुर्यवंशी, दिपाली बोरसे पुढाकार घेत आहेत.