नाशिक : इगतपुरी तालुक्यात होणारा बालविवाह थांबविण्यासाठी गेलेल्या ग्रामसेविकेला मुली मोठ्या झाल्यावर जाड्या होतात म्हणून आम्ही लवकर लग्न करतो. नंतर स्थळ येत नाहीत आमच्या मुली तशाच राहतात असे अजब उत्तर मुलीच्या आईने दिल्याने ग्रामसेवक गोंधळुन गेले आहेत. इगतपुरी तालुक्यातील वाकी ग्रामपंचायत येथील बीटूरली येथे एक बालविवाह होत असल्याची माहिती ग्रामसेवीकेला समजली होती. ग्रामसेविकेने पाड्यावर जाऊन मुलीसह कुंटूंबीयांची भेट घेतली. त्यावेळी मुलीच्या आईन मुली मोठ्या झाल्यावर झाड होतात म्हणुन मुलींचे कमी वयात लग्न लावल्या जाते असे उत्तर दिले. यावर ग्रामसेविकेने बालविवाह केल्याचे काय वाईट परिणाम होतात हे मुलीसह तिच्या कुटुंबाला समजावून सांगितले. मात्र, मुलीच्या आईने सांगितले की, मॅडम मुली मोठ्या झाल्यावर जाड्या होतात मग त्याना कोणी स्वीकारत नाही, स्थळ येत नाहीत, असे उत्तर दिले. हे उत्तर ऐकून ग्रामसेविका अचंबित झाल्या.
बाल विवाह प्रमुख कारण : नाशिक जिल्ह्यात इगतपुरी, त्र्यंबकेश्वर,पेठ सुरगाणा, हरसुल या सारखे आदिवासी तालुके आहेत.या तालुक्यांमध्ये बालविवाहांचे प्रकार होत असतात. अल्पवयीन गर्भवती मुलगी असल्याने तिच्यावर तालुकास्तरावर उपचार करणे, तिच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक ठरू शकते. त्यामुळे अधिक उपचारासाठी नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे एप्रिल 2020 ते फेब्रुवारी 2023 या वर्षात नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयामध्ये 165 अल्पवयीन गरोदर मातेची प्रसूती करण्यात आलेली आहे. या तीन वर्षांमध्ये बालमातांचे प्रमाण वाढल्याचे दिसून आले आहे.
पोस्को सारखा कायदा : बालकांच्या हितासाठी आणि लैंगिक छळापासून त्यांचे संरक्षण करून त्यांना आधार मिळावा, यासाठी 18 वर्षाखालील मुला मुलींचे संरक्षण व्हावे यासाठी 2012 मध्ये प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन फॉर्म म्हणजे पोस्को कायदा तयार करण्यात आला आहे. असे असतानाही अल्पवयीन मुलींवर होणारे अन्याय फारसे कमी झालेले नाहीत. अजूनही खेळण्याच्या वयात अल्पवयीन मुलींवर मातृत्व लादले जात आहे. तर ग्रामीन भागातील मुलींचे कमी वयातच लग्न लाऊन दिल्या जात आहेत. त्यामुळे बालमाता मृत्यूचे प्रमाण देखील वाढले आहे.
जनजागृती केली जाते : शासन स्तरावर तसेच चाइल्ड लाइन या सामाजिक संस्थेमार्फत बालविवाह रोखण्यासंदर्भात ग्रामीण भागात सातत्याने जनजागृती केली जाते. परंतु असे असतानाही बालविवाह पूर्णत: थांबलेले नाहीत. बालमाता, कुमारीमाता प्रसूतीसाठी आल्यानंतर बाब समोर येते आहे. कायदा आहे, परंतु त्याची कठोर अशी अंमलबजावणी होत नाही. त्यामुळे अल्पवयीन मुलींचा गैरफायदा घेतला जातो असे दिसून येत आहे.
हेही वाचा - Ajit Pawar BJP Alliance : माझा भाजपमध्ये जाण्याचा प्रश्नच नाही; अजित पवारांचे स्पष्टीकरण