ETV Bharat / state

ग्रामपंचायत निवडणूक; नाशिक जिल्ह्यात सकाळच्या सत्रात 18.50 टक्के मतदान

नाशिक जिल्ह्यात 565 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत असून सकाळी 7.30 पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळी सत्रात मतदान करण्यासाठी मतदारांचा कमी उत्साह दिसून आला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ 18.50 टक्के मतदान झाले असून दुपारनतंर मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतील, असा अंदाज आहे.

author img

By

Published : Jan 15, 2021, 3:06 PM IST

नाशिक
नाशिक

नाशिक - जिल्ह्यातील 565 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत असून सकाळच्या सत्रात केवळ 18.50 टक्के मतदान झाले आहे. नाशिकमध्ये ग्रामपंचायतींच्या 4227 जागांसाठी 11 हजार 54 उमेदवार रिंगणात आहेत.

नाशिक

नाशिक जिल्ह्यात 565 ग्रामपंचायतींसाठी आज मतदान होत असून सकाळी 7.30 पासून शांततेत मतदानाला सुरुवात झाली. सकाळी सत्रात मतदान करण्यासाठी मतदारांचा कमी उत्साह दिसून आला. सकाळी 11.30 वाजेपर्यंत जिल्ह्यात केवळ 18.50 टक्के मतदान झाले असून दुपारनतंर मतदार मतदान करण्यासाठी बाहेर पडतील, असा अंदाज आहे.

शांततेत मतदान प्रक्रिया सुरू

नाशिक जिल्ह्यातील 55 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून यातील 1662 उमेदवार निवडून आले आहेत. प्रत्यक्षात 4227 जागांसाठी 11 हजार 54 उमेदवार रिंगणात आहे. तर 12 लाख 84 हजार 109 पात्र मतदार असून ह्यात 6 लाख 11 हजार 754 महिला तर 6 लाख 72 हजार 453 पुरुष मतदार आहेत. नाशिक जिल्ह्यातील 1952 मतदान केंद्रावर मतदान सुरू असून सुरक्षित अंतराचे सर्व नियम पाळून शांततेत मतदान प्रक्रिया सुरू आहे. जिल्ह्यातील 44 ग्रामपंचायत संवेदनशील असून 8 अतिसंवेदनशील असल्याने ह्या ठिकाणी अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. निवडणूक प्रक्रियेत प्रशासनाचे 389 अधिकारी, 9760 कर्मचारी कार्यरत असून 4 हजार 760 पोलीस कर्मचारी बंदोबस्तासाठी तैनात आहेत.

मतदान यंत्र बंद

बेलत गव्हाण ग्रामपंचायत निवडणुकीत वार्ड क्रमांक 2 मधील मतदान यंत्र सकाळी 11 वाजून 35 मिनिटांपर्यंत बंद असल्याने ह्या ठिकाणी काही काळ गोंधळाचे वातावरण झाले होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.