ETV Bharat / state

नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात गांजा, कैद्याने याठिकाणी लपवून आणला आत

मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने न्यायालयीन कामकाज झाल्यावर पुन्हा कारागृहात जाताना चक्क अंडरपॅन्टमध्ये गांजा लपवून आणल्याची बाब समोर आली आहे.

कैद्याने अंडरपॅन्टमध्ये लपवून आणला गांजा
author img

By

Published : Jun 13, 2019, 8:42 AM IST

नाशिक - मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका कैद्याने न्यायालयीन कामकाज झाल्यावर पुन्हा कारागृहात जाताना चक्क अंडरपॅन्टमध्ये गांजा लपवून आणल्याची बाब समोर आली आहे. याबाबत कारागृह प्रशासनाने नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित कैद्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

कैदी नंबर 471 सुनील चांगले (रा हनुमान वाडी, पंचवटी, नाशिक) याला 11 जूनला दुपारी न्यायालयात नेण्यात आले होते. न्यायालयाचे कामकाज संपल्यावर दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास या कैद्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले असताना कारागृहातील झडती अंमलदार विजयसिंह निकम, गेट कीपर रामकिसन बोधने, ज्ञानेश्वर दळवी यांनी संशयित सुनील चांगले याची झडती घेतली. यावेळी त्याने तंबाखूच्या पुडीमध्ये गांजा टाकून चिकट टेप लावून अंडरपॅन्टमध्ये लपवलेला सापडला. विजयसिंह निकम यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी याची माहिती तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना सांगितली, घटनेचे गांभीर्य ओळखून संशयित सुनील चांगले याच्याविरोधात नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

यापूर्वी देखील नाशिक सेंट्रल जेलमध्ये अमली पदार्थ, मोबाईल सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत.

Intro:कैद्याने अंडरपॅन्ट मध्ये लपवुन आणला गांजा .नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल..

Body:नाशिक रोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असलेल्या एका
कैद्याने न्यायालयीन कामकाज झाल्यावर पुन्हा कारागृहात जातांना चक्क अंडरपॅन्ट मध्ये गांजा लपवून आणल्याची बाब समोर आली आहे..याबाबत कारागृहात प्रशासनने नाशिक रोड पोलीस ठाण्यात संशयित कैद्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे..

11 जून रोजी दुपारी कैदी नंबर 471 सुनील चांगले राहणार हनुमान वाडी, पंचवटी, नाशिक,याला न्यायालयात नेण्यात आला होतं, न्यायालयाचे कामकाज संपल्यावर दुपारी साडेचार ते पाच वाजेच्या सुमारास या कायद्याला पुन्हा कारागृहात पाठवण्यात आले ,असताना कारागृहातील झडती अंमलदार विजयसिंह निकम, गेट कीपर रामकिसन बोधने ,ज्ञानेश्वर दळवी यांनी संशयित सुनील चांगले यांची झडती घेतली असता,त्याने तंबाखूच्या पुडी मध्ये गांजा टाकून चिकट टेप लावून अंडर पॅन्ट मध्ये लपवलेला आढळल्याचे विजयसिंह निकम यांना हा प्रकार निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ह्याची माहिती तुरुंग अधिकारी ज्ञानेश्वर चव्हाण यांना सांगितली, घटनेचं गांभीर्य ओळखून संशयित सुनील चांगले याच्या विरोधात नाशिक रोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
या आधी देखील नाशिक सेंट्रल जेल मध्ये अमली पदार्थ,मोबाईल सापडण्याच्या घटना समोर आल्या आहेत

प्रकारची माहिती त्यांनी वरिष्ठ अधिकारी ज्ञानेश्‍वर गोरख चव्हाण यांना सांगितले घटनेचे गांभीर्य ओळखून नाशिक रोड कारागृहातील तुरुंगाधिकारी न्यानेश्वर गोरख चव्हाण यांच्या तक्रारीवरून सुनील चांगले याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस करीत आहेत यापूर्वी अनेक वेळा नाशिक रोड कारागृहात यांच्या सदृश्य शोच्या वस्तू सापडल्या सापडले आहेत

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.