ETV Bharat / state

मनमाडजवळ लांडग्याच्या हल्ल्यात दोन महिलांसह चारजण गंभीर जखमी - मनमाड लांडग्याचा हल्ला लेटेस्ट न्यूज

पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या हिसवळ बुद्रुक येथे घडली. मनमाडसह नांदगाव तालुक्यात वनविभागाचे मोठे जंगल असून त्यात हरिण, मोर, ससे, लांडगे यासह इतर वन्यप्राणी आहेत. मात्र, या भागात लांडग्याने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

मनमाड लांडग्याचा हल्ला लेटेस्ट न्यूज
मनमाड लांडग्याचा हल्ला लेटेस्ट न्यूज
author img

By

Published : Oct 31, 2020, 1:40 PM IST

Updated : Oct 31, 2020, 2:58 PM IST

मनमाड - मनमाडपासून जवळ असलेल्या हिसवळ येथे लांडग्याच्या हल्ल्यात दोन महिलांसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. जखमींना मनमाड उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

मनमाडजवळ लांडग्याच्या हल्ल्यात दोन महिलांसह चारजण गंभीर जखमी

हेही वाचा - बळीराजा म्हणतो... कोरोना महामारीने जगायला शिकवले

पिसाळलेल्या लांडग्याने केलेल्या हल्ल्यात दोन महिलांसह चारजण गंभीर जखमी झाल्याची घटना मनमाडपासून जवळ असलेल्या हिसवळ बुद्रुक येथे घडली. या घटनेत मीना आहेर, सुनीता पवार, जगन आहेर, मोहन सोळसे हे शेतात जात असताना दबा धरून बसलेल्या लांडग्याने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. त्यात चारही जण गंभीर जखमी झाले. त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच वनाधिकारी डी. बी. बोरसे, डी. जी. सूर्यवंशी, सी. इ. भुजबळ, अशोक सोनावणे यांनी उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन जखमींची विचारपूस केली.

मनमाडसह नांदगाव तालुक्यात वनविभागाचे मोठे जंगल असून त्यात हरिण, मोर, ससे, लांडगे यासह इतर वन्यप्राणी आहेत. मात्र, या भागात लांडग्याने हल्ला केल्याची ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे.

हेही वाचा - खड्डे बुजवण्याचा चंद्रकांत पाटलांचा कार्यक्रम आता माझ्याकडे; मंत्री अशोक चव्हाणांचा टोला

Last Updated : Oct 31, 2020, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.