नाशिक - खरतड अशी समजली जाणारी आयर्नमॅन स्पर्धेत नाशिकच्या चौघांनी विजय मिळवला. त्यापैकी तीघांचे नाशिकमध्ये ढोल-ताशांच्या गजरात स्वागत झाले. एक आयर्नमॅन मात्र काही कारणास्तव नाशिकमध्ये येऊ शकले नाहीत.
ऑस्ट्रेलिया येथे झालेल्या आयर्नमॅन 2019 या स्पर्धेत नाशिकचे किशोर घुमरे, प्रशांत डबरी, महेंद्र छोरिया, अरूण गचाले यांनी भाग घेतला होता. या स्पर्धेत 4 किमी अंतर पाण्यात पोहणे, 180 किमी सायकल चालविणे आणि 42 किमी धावणे, असा एकूण 226 किमीचा प्रवास केवळ 17 तासांत करावा लागतो. ही स्पर्धा वेळेत पूर्ण करत या चार नाशिकरांनी आपले नावलौकिक केले.
यापूर्वी नाशिकला चार आयर्नमॅन किताब मिळाले असून आता पुन्हा चार आयर्नमॅन किताब मिळाले आहे. त्यामुळे पुढील काळात भारतात नाशिकची आयर्न सिटी म्हणून आणखी एक ओळख निर्माण होईल, असा विश्वास या विजेत्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - म्हणून अनिवासी भारतीयाने अमेरिकन पत्नीबरोबर दुसऱ्यांदा केला विवाह...