नाशिक : मुंबई येथे राहणारे कौशिक आणि वर्मा कुटुंब हे त्रंबकेश्वर आणि शिर्डी येथे दर्शन करून मुंबईला घरी जात होते. त्यानंतर इगतपुरी जवळील पंढरपूरवाडी समोर यांची असेंट कार भरधाव वेगात होती. तेव्हा गाडीचे पुढचे टायर फुटल्याने ती उडून नाशिककडे येणाऱ्या टोइंग कारवर जोरात आदळली. त्यात कारचा चक्काचूर झाला. महामार्गावर सुरक्षा पथकाचे पोलीस निरीक्षक अमोल वालझरे यांनी पथकासह घटनास्थळी घाव घेऊन जखमींना बाहेर काढले.
अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प : सद्गुरु नरेंद्रचार्य महाराज संस्थांच्या रुग्णवाहिका यांनी जखमींना तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी जखमींपैकी मनोरमा कौशिक( वय 28) खुशी कौशिक वय (वय 6) रणजितकुमार वर्मा ( वय 34 राहणार ठाणे) चालक कबीर सोनवणे (वय 32) यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. अपघातानंतर काही काळ वाहतूक ठप्प झाली होती. सविस्तर वृत्त थोड्याच वेळात
दिल्लीतील अपघाताची घटना : ब्रेक फेल झाल्यामुळे दिल्लीत थार कारने ७ जणांना चिरडले होते. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला होता. 8 तारखेला ही दुर्घटना घडली आहे. त्याचबरोबर या अपघातात ५ जण जखमी झाले होते. त्यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक होती. उपचारासाठी जखमींना रूग्णालयात दाखल केले होते. अपघात होताच आजूबाजूच्या परिसरात खळबळ उडाली होती. पोलीस लोकांच्या माहितीवरून घटनास्थळी पोहोचले होते.
हेही वाचा : Maharashtra Politics: शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून अधोगतीच सुरू- जयंत पाटील