ETV Bharat / state

नाशिक : बागलाणच्या जायखेड्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह, एकूण आकडा 32 वर

author img

By

Published : Jun 18, 2020, 8:38 PM IST

जायखेडा येथील कोरोनाबाधित वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या पहिल्या १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यांच्या संपर्कातील ३२ व्यक्तींचे अहवाल बुधवारी एकाचवेळी पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर ३२ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जायखेडा, जयपूर, वाडीपिसोळ, सोमपूर, ताहराबाद येथील जवळपास १६ रुग्णांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात तातडीने हलविण्यात आले आहे.

बागलाणच्या जायखेड्यात पुन्हा 4 पॉझिटिव्ह

नाशिक - जिल्ह्याच्या बागलाण तालुक्यातील जायखेडा येथे बुधवार २१ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा समोर आल्याने तालुक्यात खळबळ उडाली होती. यातच, आज (गुरुवार) जायखेड्यात पुन्हा ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दिवसागणिक रुग्णांची वाढती संख्या हा चिंतेचा विषय ठरत असून, एकट्या जायखेड्यातील कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ३२ वर पोहोचला आहे.

बागलाण तालुक्यातील जायखेडा येथील कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येमुळे ३६ व्यक्तींनी मालेगाव येथे खासगी तपासणी केली होती. यापैकी ३३ जण निगेटिव्ह आले असून, तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. तसेच नाशिक येथे वैयक्तिकरित्या उपचारासाठी गेलेल्या एका व्यक्तीचा अहवालही पॉझिटिव्ह आला आहे. या रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींची यादी तयार करून त्यांना विलगीकरण केंद्रात पाठवण्याच्या तयारीत आरोग्य विभाग लागले आहे. तर, कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या कळत नकळत संपर्कात आलेल्या व्यक्तींचे धाबे दणाणले असून, कोरोनाच्या भीतीने अनेकजण स्वतःहून पुढाकार घेत आपल्या चाचण्या करून घेत आहेत. यात अनेकांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने, कुटुंबीय व संपर्कातील व्यक्तींनी सुटकेचा श्वास सोडला आहे. तर, काहींचे अहवाल पॉझिटिव्ह येत असल्याने चिंतेत अधिकच वाढ झाली आहे.

जायखेडा येथील कोरोनाबाधित वाहनचालकाच्या संपर्कात आलेल्या पहिल्या १० व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर यांच्या संपर्कातील ३२ व्यक्तींचे अहवाल बुधवारी एकाचवेळी पॉझिटिव्ह आले आहेत. यानंतर ३२ कोरोनाबाधितांच्या संपर्कातील जायखेडा, जयपूर, वाडीपिसोळ, सोमपूर, ताहराबाद येथील जवळपास १६ रुग्णांना अजमेर सौंदाणे येथील विलगीकरण केंद्रात तातडीने हलविण्यात आले आहे.

आमदार बोरसेंचा सोशल मीडियावर खुलासा -

जायखेडा येथील मृत तरुण हा आमदार दिलीप बोरसेंचा कार्यकर्ता असल्याने त्याच्या अंत्यविधीसाठी आमदार बोरसे कुटुंबियांसह सुरक्षित अंतर ठेवून हजर होते. मात्र, नंतर मृताचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याने उपस्थितांच्या मनात धडकी भरली होती. आमदारांच्या उपस्थितीमुळे शंका कुशंका व्यक्त केल्या जात होत्या. मात्र, आमदार बोरसे यांनी होम क्वारंटाईन होत, आपल्या जवळच्या २३ व्यक्तींचे स्वॅब खाजगी प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविले होते. सुदैवाने या सर्वांचे अहवाल निगेटिव्ह आल्याने संबंधितांनी सुटकेचा श्वास सोडला. तसेच, उलट सुलट चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे. यासंदर्भात आ. दिलीप बोरसे यांनी स्वतः समाज माध्यमातून खुलासा केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.