ETV Bharat / state

मुंबईतील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी; ...तर पुण्यातही प्रयोग शक्य

author img

By

Published : Apr 29, 2020, 8:26 PM IST

लिलावती रुग्णालयात एका कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. या पहिल्या यशस्वी प्लाझ्मा थेरपीनंतर आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. मात्र, ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे.

first-plasma-therapy-successful in mumbai-says-rajesh-tope

नाशिक - मुंबई येथील लिलावती रुग्णालयात कोरोना रुग्णावर पहिली प्लाझ्मा थेरपी करण्यात आली आहे. त्यात डाॅक्टरांना यश आले असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. नाशिकमधील जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोना उपाययोजना संदर्भात बैठक पार पडली. त्यांतर ते माध्यमांशी बोलत होते.

मुंबईतील पहिली प्लाझ्मा थेरपी यशस्वी

हेही वाचा- दिल्लीतील भाजीमार्केटमधील ११ व्यापाऱ्यांना कोरोनाची लागण

यावेळी बोलताना राजेश टोप म्हणाले, की लिलावती रुग्णालयात एका कोरोना रुग्णावर प्लाझ्मा थेरपी करण्यात आली असून ती यशस्वी झाली आहे. या पहिल्या यशस्वी प्लाझ्मा थेरपीनंतर आता नायर रुग्णालयात दुसरी थेरपी केली जाणार आहे. मात्र, ही थेरपी करताना योग्य मार्गदर्शक सूचनांचे तंतोतंत पालन करणे गरजेचे आहे. असे पालण केल्यास पुण्यातही असा प्रयोग शक्य असल्याचे ते म्हणाले.

मुंबई महापालिका आयुक्त प्रवीण परदेशी यांनी लिलावती रुग्णालयात रुग्णावर प्लाझ्मा थेरपी यशस्वी झाली असल्याची माहिती आपल्याला फोन करुन दिली असल्याचेही टोप म्हणाले.

काय आहे प्लाझ्मा थेरपी...

कोरोना ग्रस्त रुग्णाच्या शरीरात कोरोना विरुद्धच्या लढण्यासाठी प्रतिपिंडे (अँटी-बॉडिज्) तयार होतात. त्यानुसार अशा कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये प्रतिपिंडे तयार झालेली असल्यास त्या रुग्णाला दाता म्हटले जाते. अशा दात्यांकडून त्यांच्या रक्तातील किमान 800 मिली लिटर प्लाझ्मा घेतला जाऊ शकतो. कोरोना बाधित व्यक्तीच्या उपचारासाठी अँटी-बॉडिज तयार करण्यासाठी 200 मिली लिटर प्लाझ्मा उपयोगी पडतो. अशा पद्धतीने कोरोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तीपासून तीन ते चार रुग्णांवर प्लाझ्मा थेरेपीनुसार उपचार केले जाऊ शकतात.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.