ETV Bharat / state

विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण, मालेगाव येथे बंदोबस्ताला गेलेल्या पोलिसाला संसर्ग

रुग्ण पोलीस कर्मचारी असून त्यांची मालेगाव येथे बंदोबस्तासाठी नियुक्ती झाली होती. त्यांना ताप येत असल्याने त्यांचे मालेगाव येथे ता. २८ एप्रिलला स्वॅब घेतले होते. यानंतर त्यांना अधिक त्रास होऊ लागला. यानंतर या स्वॅबच्या अहवालाची पडताळणी केली असता १ मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

विंचुरमध्ये पहिला कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

author img

By

Published : May 2, 2020, 11:01 AM IST

नाशिक - जिल्ह्यातील लासलगावजवळील विंचुर येथे पहिला कोरोनाबाधित रुग्ण सापडला. हा रुग्ण पोलीस कर्मचारी असून त्यांची मालेगाव येथे बंदोबस्तासाठी नियुक्ती झाली होती. त्यांना ताप येत असल्याने त्यांचे मालेगाव येथे ता. २८ एप्रिलला स्वॅब घेतले होते. यानंतर त्यांना अधिक त्रास होऊ लागला. यानंतर या स्वॅबच्या अहवालाची पडताळणी केली असता १ मे रोजी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.

मालेगाव येथे बंदोबस्तासाठी असताना ताप येऊ लागल्याने २८ एप्रिलला या पोलीस कर्मचाऱ्याचे स्वॅब तपासणीसाठी घेतले होते. त्यानंतर ते विंचुर येथील निवासस्थानी आले होते. येथेही त्यांना २९ एप्रिलला त्यांना पुन्हा त्रास होऊ लागला. ते विंचुर येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी गेले असता, तेथे प्राथमिक उपचार करून त्यांना शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले. येथील शासकीय वैद्यकीय अधिकारी डॉ. पी. आर. जाधव यांना कोरोना आजाराचे लक्षणे जाणवल्याने त्यांनी रुग्णास नाशिक येथे शासकीय रुग्णालयात पाठवले. तेथे जुजबी उपचार करून रुग्णास त्याच दिवशी परत पाठविण्यात आले. त्यानंतर १ मे रोजी त्यांना जास्त त्रास होऊ लागल्याने ते पुन्हा येथील शासकीय रुग्णालयात आले. येथे डॉ. जाधव यांनी सखोल चौकशी केली असता रुग्णाने मालेगाव येथे बंदोबस्तास असल्याची व तेथे स्वॅब नमुना घेतला असल्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. जाधव यांनी त्यांच्या वरिष्ठांशी संपर्क साधून या रुग्णाच्या तपासणी अहवालासंदर्भात विचारपूस केली. हा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. एन. के. चव्हाण, डॉ. साहेबराव गावले, डॉ. पी. आर. जाधव आदी वैद्यकीय पथक घेऊन रुग्णाच्या घरी गेले. रुग्णासह त्याची पत्नी, दोन मुले, दोन मजूर अशा एकूण सहा जणांना येवला येथील बाभूळगावच्या कोव्हिड-१९च्या केंद्रात उपचारांसाठी दाखल करण्यात आले. तसेच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींना विंचुर येथील कर्मवीर विद्यालयात क्वारन्टाइन करण्यात आले आहे. रुग्णाच्या आजूबाजूचा परिसर बंद करून औषधाची फवारणी करण्यात आली.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.