ETV Bharat / state

नाशिकमध्ये 51 मद्य विक्री दुकान मालकांवर गुन्हा, 'सोशल डिस्टनसिंग'चे उल्लंघन

केंद्र सरकारच्या आदेशानंतर नाशिकमध्ये काल दिनांक 4 मे रोजी दुपारी मध्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, ही दुकाने सुरू होताच तळीरामांनी सर्वच दुकानासमोर मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले.

नाशिक
नाशिक
author img

By

Published : May 5, 2020, 5:11 PM IST

नाशिक - सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कलम 188 अंतर्गत नाशिकमधील 51 मद्य विक्री दुकान मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तसेच जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश येत नाही तोपर्यंत मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

नाशिकमध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता जिल्ह्याचा समावेश 'रेड झोन'मध्ये करण्यात आला आहे. मात्र, केंद्र सरकारच्या आदेशानंतर नाशिकमध्ये काल दिनांक 4 मे रोजी दुपारी मध्य विक्रीची दुकाने सुरू करण्यात आली होती. मात्र, ही दुकाने सुरू होताच तळीरामांनी सर्वच दुकानासमोर मोठी गर्दी केल्याचे चित्र बघायला मिळाले.

सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमांचे कुठेही पालन करण्यात आले नाही, काही ठिकाणी गर्दी आटोक्यात आणण्यासाठी पोलिसांनी तळीरामांना काठीचा प्रसाद दिला. मात्र, तरी देखील गर्दी वाढत असल्याने दोन तासात पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांच्या आदेशानंतर शहरातील सर्व मद्य विक्रीचे दुकान बंद करण्यात आली.

यानंतर जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी आदेश काढत पुढील आदेश येईपर्यंत नाशिक जिल्ह्यातील सर्व मद्य विक्री दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले. तसेच सुरक्षित अंतर राखण्याच्या नियमाचे उल्लंघन केल्याने कलम 188 अंतर्गत 51 मद्य विक्री दुकान मालकांवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.