नाशिक - जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याचे चित्र आहे. शुक्रवारी 55 कोरोनाबाधित वाढल्याने नाशिककरांची चिंता वाढलीय. जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 163 पोहचला असून आतापर्यंत 66 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 786 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
शुक्रवारी जिल्ह्यात 55 रुग्ण वाढले असून यामध्ये नाशिक शहरात 26, मालेगाव 14, सिन्नर 5, नांदगाव 3, देवळा आणि येवला प्रत्येकी एक रुग्णाचा समावेश आहे. जिल्ह्याबाहेरील 5 जणांचा यात समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा 1 हजार 163 पोहोचला आहे. सद्यस्थितीत नाशिक जिल्ह्यातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 277 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
मालेगाव 5 जणांचे अहवाल मृत्यू नंतर आले पॉझिटिव्ह..
मालेगावातील 14 जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामधील 5 जणांचा अहवाल येण्यापूर्वीच मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील एकूण 66 मृत्यूपैकी एकट्या मालेगावामधील मृतांची संख्या 52 वर गेली आहे. सद्यस्थितीत मालेगावातील वेगवेगळ्या हॉस्पिटलमध्ये 130 रुग्ण उपचार घेत आहेत.