ETV Bharat / state

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणांचे वाटप

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर कृषी निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दिंडोरीतील अनेक विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देत मे. बोरा कृषी सेवा केंद्र वणीचे संचालक महेंद्रशेठ बोरा यांनी खोरीपाडा परिसरातील शेतकऱ्यांना आज (शनिवार) तब्बल 5 टन खतांचे वाटप करण्यात आले.

Fertilizer seeds Distribution to farmers
दिंडोरी तालुक्यात शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणांचे वाटप
author img

By

Published : May 9, 2020, 6:57 PM IST

दिंडोरी (नाशिक) : दिंडोरी तालुक्यातील खोरीपाडा गावात शेतकऱ्यांना खते आणि बियाणांचे वाटप करण्यात आले. विधानसभा उपाध्यक्ष आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते या खते आणि बियाणे वाटपाची सुरुवात करण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांनी घरचेच सोयाबीन बियाणे वापरावे, असे आवाहनही आमदार झिरवाळ यांनी केले.

दिंडोरी तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... नाशकात १२ तासांत ५० कोरोनाबाधितांची भर, जिल्ह्याचा आकडा ६०० पार

कोरोना विषाणूच्या पार्श्वभुमीवर कृषी निविष्ठा विक्री केंद्रात होणारी अनावश्यक गर्दी टाळण्यासाठी शेतकऱ्यांना बांधावरच खते आणि बियाणे उपलब्ध करुन देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी दिंडोरीतील अनेक विक्रेत्यांना आवाहन करण्यात आले होते. सदर आवाहनास प्रतिसाद देत मे. बोरा कृषी सेवा केंद्र वणीचे संचालक महेंद्रशेठ बोरा यांनी खोरीपाडा परिसरातील शेतकऱ्यांना आज (शनिवार) तब्बल 5 टन खतांचे वाटप करण्यात आले. आमदार नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले. तसेच यावेळी शेतकऱ्यांना सोयाबीनचे घरचे बियाणे असतील तर त्याची उगवण क्षमता कशी तपासायची, याबाबत प्रात्यक्षिके दाखवून बियाणांची गरज गावातच भागवणेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

कोरोना विषाणू संदर्भात नागरिकांनी सामाजिक भान राखावे. आवश्यकता नसेल तर घराबाहेर न पडता शासनास सहकार्य करावे. तसेच दोन व्यक्तींमधील किमान अंतराच्या नियमाचे पालन आणि तोंडाला मास्क जरुर लावावा, असेही झिरवाळ यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... लॉकडाऊनमुळे असंघटीत क्षेत्रातील कामगारांची स्थिती दिवसेंदिवस गंभीर- जागतिक कामगार संघटना

कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी देखील या परिस्थितीत शेतकऱ्यांना बांधावरच रास्त दराने बियाणे आणि खते उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. या बियाणे वाटपावेळी खोरीपाडा येथील सम्राट राऊत, हस्तेदुमाल येथील देवराम राऊत, अहिवंतवाडी येथील जयराम गावित, चौसाळ येथील दत्तु पाटील आदी शेतकरी तसेच वणी कृषी सेवा केंद्र चालक, कृषी सहाय्यक श्रीमती भदाणे, संदीप बोर्वे, कृषी पर्यवेक्षक सजंय सावंत, पंचायत समिती कृषी अधिकारी डी. सी. साबळे आणि तालुका कृषी अधिकारी अभिजीत जमधडे आदी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.