ETV Bharat / state

पोलीस असलेल्या जावायाने केला चाकू हल्ला, सासऱ्याचा मृ्त्यू तर सासू अन् पत्नी गंभीर जखमी - पोलीस असलेल्या जावायाने केला चाकू हल्ला

पोलीस असलेल्या जावायाने सासू, सासरा व पत्नीवर चाकू हल्ला केल्याची ( Police Attempt to Kill ) घटना शुक्रवारी (दि. 8 एप्रिल) रोजी दोडी (ता. सिन्नर) येथे घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या सासऱ्याचा रविवारी (दि. 10 एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

मृत सासरे
मृत सासरे
author img

By

Published : Apr 10, 2022, 3:46 PM IST

father in law died in a police attempt to kill in-laws along with his wife in Nashik district

नाशिक - पोलीस असलेल्या जावायाने सासू, सासरा व पत्नीवर चाकू हल्ला केल्याची ( Police Attempt to Kill ) घटना शुक्रवारी (दि. 8 एप्रिल) रोजी दोडी (ता. सिन्नर) येथे घडली होती. या हल्ल्यात जखमी झालेल्या सासऱ्याचा रविवारी (दि. 10 एप्रिल) उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

पोलीस असलेल्या जावायाने केला चाकू हल्ला

सूरज देविदास उगलमुगले ( रा. उपनगर, नाशिक ), असे संशयित पाेलिसाचे नाव असून ताे मनमाड पोलीस ठाण्यातील दंगा नियंत्रण कक्षात कार्यरत आहे. सूरजने दोडी दापूर येथील सासरे निवृत्ती दामोदर सांगळे (वय 58 वर्षे), सासू शिला निवृत्ती सांगळे ( वय 52 वर्षे) व पत्नी पूजा सुरेश उगलमुगले यांना मारहाण करत चाकूने वार केले होते. तिघांवर नाशिकरोड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना निवृत्ती सांगळे यांचा मृत्यू झाला. शिला सांगळे व पूजा उगलमुगले यांची प्रकृती चिंताजनक आहे. याबाबत नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील वावी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला असून संशयित आरोपी सुरज उगलमुगले पळून गेला आहे. या प्रकरणी सिन्नर पाेलीस अधिक तपास करत आहेत

पोलीस सूरज उगलमुगले
पोलीस सूरज उगलमुगले

...तर अनर्थ टळला असता - यापूर्वी पूजा उगलमुगलेने शहर हद्दीत असलेल्या उपनगर पोलीस ठाण्यात पती सूरज विरोधात तक्रार दिली होती. पण, पोलिसांनी कारवाई केली नाही, असा आरोप सामाजिक कार्यकर्ता बाळासाहेब वाघ यांनी केले आहे. त्याचवेळी कारवाई झाली असती तर पुढील अनर्थ टळता असता.

हेही वाचा - VIDEO : येवल्यात संतप्त नागरिकांनी पेटवली मांस घेऊन जाणारी गाडी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.