मालेगाव (नाशिक): मालेगावात कांद्याला भाव मिळावा (onion price), नाफेड (NAFED) संस्था बंद करावी या प्रमुख मागण्यांसाठी मुंबई-आग्रा महामार्गावर शेतकरी संघटनेने रास्तारोको (Rastraroko movement of farmers association) आंदोलन केले. शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष ललित पाटील (farmers association lalit patil)यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. यावेळी जोरदार घोषणाबाजी करत मुंबई-आग्रा महामार्ग (Mumbai Agra highway blocked ) रोखुन धरण्यात आला.
अशा आहेत प्रमुख मागण्या- (Major demands) कांद्याला भाव मिळावा. तसेच नाफेड ही संस्थाच बंद करावी. यासह, अनेक मागण्यांसाठी शेतकरी संघटनेने मुंबई-आग्रा महामार्गावर रास्तारोको आंदोलन केले. आक्रमक शेतकऱ्यांनी रस्त्यावर कांदा फेकून देत आंदोलन सुरू केले. यावेळी केंद्र सरकारची अंत्ययात्रा काढण्यात आली. तिरडी घेऊन यावेळी आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे कर्ज माफ (Farmers loan waiver) करावे यासह कांद्याला भाव मिळावा ही मुख्य मागणी आहे.
मालेगावच्या टेहरे गावाचे नाव जागतिक पातळीवर शेतकरी संघटनेचे शरद जोशी (Sharad Joshi of Farmers Association) यांनी 40 वर्षांपूर्वी मुंबई-आग्रा महामार्गावर असलेल्या याचं टेहरे गावात कांदा प्रश्नी पहिले आंदोलन केले होते. यावेळी गोळीबार करण्यात आला होता. तेव्हा दोन शेतकऱ्यांना आपले प्राण गमावावे लागले होते. या आंदोलनाची दखल तत्कालीन केंद्र सरकारने घेतली होती. यामुळे टेहरे गावचे नाव जागतिक पातळीवर नोंदवले गेले होते.