सिन्नर ( नाशिक ): समृद्धी महामार्गाच्या लगत शेतकऱ्यांसाठी वहिवाट रस्ता हा वॉल कंपाऊंडच्या आत केल्याने याचा फायदा शेतकऱ्यांना शेतीमाल ने- आण करण्यासाठी होणार नसल्याने सिन्नर तालुक्यातील दुसिंगपूर येथे शेतकऱ्यांनी व छावा संघटनेने ठिय्या करत, घोषणाबाजी करून काळे झेंडे दाखवून लोकार्पण सोहळ्याचा निषेध केला आहे. नागपूर ते शिर्डी 520 किलोमीटर लांबीच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नागपूर येथे लोकार्पण सोहळा पार पडला.
तीव्र आंदोलन करत: दुसरीकडे नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील दुसिंगपूर येथे संतप्त शेतकरी व छावा संघटनेच्या वतीने समृद्धी महामार्गावर येत ठिय्या केला आहे. यावेळी काळे झेंडे दाखवत घोषणाबाजी करून निषेध व्यक्त केला आहे. वॉल कंपाऊंड पलीकडून समृद्धी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी शेतीमाल ने- आण करण्यासाठी वहिवाट रस्ता खुला करून द्यावा, अन्यथा ही अपेक्षाही तीव्र आंदोलन करत दुसऱ्या टप्प्यातील शिर्डी- मुंबई समृद्धी महामार्गचे लोकार्पण करून दिले जाणार, नसल्याचा इशारा दिला आहे.
पहिल्या टप्प्याचे उद्घाटन: हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग ( Nagpur Mumbai Samruddhi Expressway ) असे अधिकृत नाव असलेल्या समृद्धी महामार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांच्या हस्ते पहिल्या टप्प्याचे उद्घाटन ( inaugurates first phase ) झाले. पहिला टप्पा नागपूरला अहमदनगर जिल्ह्यातील शिर्डी या मंदिर शहराशी 520 किमी अंतरावर जोडतो. 'हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग' असे अधिकृत नाव असलेल्या एकूण प्रकल्पाची लांबी ७०१ किमी असेल. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून या महामार्गाने आकार घेतलेला आहे. हा एक्स्प्रेसवे पूर्ण झाल्याने नागपूर ते मुंबई प्रवासाचा वेळ सात तासांवर येईल.
समृद्धी महामार्ग : नागपूर ते शिर्डीला जोडणाऱ्या 520 किलोमीटर अंतराच्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन पंतप्रधान करणार आहेत. समृद्धी महामार्ग, नागपूर-मुंबई सुपर कम्युनिकेशन एक्स्प्रेस वे प्रकल्प, हे पंतप्रधानांच्या सुधारित कनेक्टिव्हिटी, पायाभूत सुविधांच्या देशभरातील दृष्टीकोन साकार करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे. सुमारे 55 हजार कोटी रुपये खर्चून बांधला जाणारा 701 किमीचा द्रुतगती मार्ग - हा भारतातील सर्वात लांब द्रुतगती मार्गांपैकी एक आहे. जो महाराष्ट्रातील 10 जिल्हे अमरावती, औरंगाबाद, नाशिक या प्रमुख शहरी क्षेत्रांमधून जातो. द्रुतगती मार्गामुळे लगतच्या इतर 14 जिल्ह्यांचा संपर्क सुधारण्यास मदत होणार आहे. विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या प्रदेशांसह राज्यातील सुमारे 24 जिल्ह्यांचा विकास होण्यास यामुळे मदत होईल.
महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मिळणार चालना : समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई द्रुतगती मार्ग, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट आदी पायभूत सुविधाच्या विकासामुळे राज्यातील विकासाला चालना मिळणार आहे. पंतप्रधान गती शक्ती अंतर्गत पायाभूत सुविधा, कनेक्टिव्हिटी प्रकल्पांच्या एकात्मिक नियोजन समन्वित अंमलबजावणीच्या दृष्टीला समर्थन देत अजिंठा, एलोरा लेणी, शिर्डी, वेरूळ, लोणार इत्यादी पर्यटन स्थळांना समृद्ध करण्यास मदत मिळणार आहे. समृद्धी महामार्ग हा महाराष्ट्राच्या आर्थिक विकासाला मोठी चालना देण्यासाठी गेम चेंजर ठरणार आहे.