ETV Bharat / state

चूक महसूल प्रशासनाची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना, नाशिकमधील प्रकार - delay in getting government subsidy

दिंडोरी तालुक्यात प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकरी लाभापासून वंचित.. शासनाकडून आलेले अनुदान वाटपात होत असलेल्या दिरंगाईमुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी..

Farmers in Dindori taluka delay in getting government subsidy
दिंडोरीतील शेतकऱ्यांना सरकारी अनुदान मिळण्यात दिरंगाई
author img

By

Published : Jan 24, 2020, 11:01 AM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यात नैसर्गिक आपत्तीने नुकसान झालेले शेतकरी अद्यापही सरकारी मदतीपासून वंचित असल्याचे दिसत आहे. शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या रक्कमेचे वाटप, दिंडोरी तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे होत नसल्याने शेतकरी मदतीपासून वंचित आहेत. मात्र, काही ठिकाणी अनेक बागायतदार शेतकऱ्यांना दोन वेळा अनुदान वाटप झाल्याने, कोणत्याही स्वरूपातील अनुदान न मिळालेल्या शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी आहे.

दिंडोरी तालुक्यातील नुकसानग्रस्त शेतकरी श्याम हिरे यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा... कडकनाथ घोटाळा : 'कुटुंबाच्या सहभागाचे पुरावे द्या, राजकारणातून संन्यास घेईन'

अवकाळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील 30,498 शेतकरी बाधित झाले. त्यापैकी 28,808 शेतकऱ्यांना 31 कोटी 4 लाख 22 हजार 971 रुपयाचे अनुदान वाटप करण्यात आले असल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली. यात फळपीकास हेक्टरी 18 हजार तर इतर पिकांना हेक्‍टरी 8 हजार, असा साधारण वाटपाचा निकष होता. अनुदान वाटप दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांसाठी करण्यात आले. अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांना अगोदर तलाठ्यांनीच मोठ्या प्रमाणात अडवणूक केल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा... अवैध दारू विक्री विरोधात रणरागिणींचा एल्गार; महिलांनी पेटवली 3 दुकाने

अशा अनेक समस्या सोडवत लवकर मदत पदरात पडेल, या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचे बँकेतील खाते क्रमांक महसूलकडून चुकीचे टाकण्यात आले. त्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात जमा झालेले नाही. त्यात काही शेतकऱ्यांना मात्र दोनदा अनुदानाची रक्कम खात्यावर महसूल विभागाकडून वर्ग करण्यात आली आहे. तेव्हा प्रशासनाच्या या निष्काळजीपणामुळे अनेक शेतकऱ्यांना अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे.

हेही वाचा... नरेंद्र मोदी घेणार ‘प्रधानमंत्री राष्ट्रीय पुरस्कार’ २०२० च्या विजेत्या मुलांची भेट

त्यातही आता दोन वेळा रक्कम जमा झालेली खाती तहसील कार्यालयाच्या आदेशामुळे तात्पुरत्या व्यवहारांसाठी बंद करण्यात आली आहेत. तेव्हा त्या शेतकऱ्यांनाही स्वतःचे पैसे बँकेतून काढता येत नाही. एकूणच 'चूक महसुलाची शिक्षा मात्र शेतकऱ्यांना' असा कारभार सध्या दिंडोरी तहसीलमध्ये सुरू असल्याचे पहायला मिळत आहे.

Intro:नाशिक -। दिंडोरी तालुक्यातील नैसर्गिक आपत्ती नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून अनुदान स्वरूपात देण्यात येणाऱ्या रक्कम वाटपात दिंडोरी तहसील कार्यालयाच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकऱ्यांना वंचित रहावे लागत असून अनेक बागायतदार शेतकऱ्यांना मात्र दुबार वाटप करण्यात आल्यामुळे शेतकरी वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.
Body:अवकाळी पावसामुळे दिंडोरी तालुक्यातील 30498 शेतकरी बाधित झाले असून त्यापैकी 28808 शेतकऱ्यांना 31 कोटी 4 लाख 22 हजार 971 रुपयाचे वाटप करण्यात आल्याची माहिती तहसील कार्यालयातून देण्यात आली, फळपीकास हेक्टरी 18 हजार तर इतर पिकांना हेक्‍टरी 8 हजार असा साधारण वाटपाचा निकष होता, अनुदान वाटप दोन हेक्टरच्या आतील शेतकऱ्यांसाठी करण्यात आले, अनुदान प्राप्त करण्यासाठी शेतकऱ्यांच्या अगोदरच तलाठ्यांनी मोठ्या प्रमाणात अडवणूक केली होती, त्यातून सुटका होऊन लवकर मदत पदरात पडेल या आशेवर असणाऱ्या शेतकऱ्यांचे बँकेतील चुकीचा खाते नंबर महसूल कडून टाकण्यात आल्यामुळे असंख्य शेतकऱ्यांचे पैसे बँक खात्यात जमा झाले नाही, त्यातच अनेक सदन शेतकऱ्यांना दुबार रक्कम त्यांच्या खात्यावर महसूल विभागाकडून वर्ग करण्यात आली, या निष्काळजीपणामुळे अनेक बाधित शेतकऱ्यांना मात्र अनुदानापासून वंचित राहावे लागले आहे, त्यात दुबार रक्कम अदा झालेली खाती तहसीलच्या आदेशाने तात्पुरती व्यवहारासाठी बंद करण्यात आल्यामुळे त्या शेतकऱ्यांना स्वतःचे पैसे सुद्धा बँकेतून काढता येत नाही, चूक महसुलाची मात्र शिक्षा शेतकऱ्यांना, असा मोगलाई कारभार सध्या दिंडोरी तहसील मध्ये सुरू असल्यामुळे शेतकरीवर्गात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे, याबाबत महसूल विभागात विचारणा केली असता शेतकऱ्यांना दुबार रक्कम आधार केली तर याबाबत त्यांच्याकडे काहीच माहिती उपलब्ध नसल्याचे स्पष्ट झाले आहे, महसूल यंत्रणेच्या ढिसाळ कारभारामुळे शेतकरी मात्र त्रासून गेला आहे,
Conclusion:अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे नुकसान झाले आहे त्यांना महागडी सरकारने मदत जाहीर केली मात्र शासकीय अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागत आहे तर काहींना मात्र द्वारा पैसे प्राप्त झाले आहे हे योग्य नाही सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पाहिजे.
बाईट -
श्याम हिरे (शेतकरी, दिंडोरी,)
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.