ETV Bharat / state

तुरे फुटल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त

दिंडोरी तालुक्यात बदलत्या हवामानामुळे उसाला तुरे फुटल्यामुळे उस उत्पादनाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे. यामुळे शेतकऱ्यांना नुकसान सहन करावा लागणार आहे.

तुरे आलेल्या उसासह शेतकरी
तुरे आलेल्या उसासह शेतकरी
author img

By

Published : Jan 5, 2020, 12:41 PM IST

नाशिक - दिंडोरी तालुक्यात ऊस लागवडीचे क्षेत्र 2 हजार 638 हेक्टर इतके आहे. दिंडोरी तालुक्यात बदलत्या हवामानामुळे उसाला तुरे फुटल्यामुळे उस उत्पादनाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना चिंता सतावत आहे.

उसाला तुरे फुटल्याने शेतकरी चिंताग्रस्त

बदलत्या हवामानामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अस्मानी संकटात सापडलेल्या ऊस शेतकऱ्याला आता तुऱ्याच्या संकटानेही चिंताग्रस्त केले आहे. उसाला तुरे फुटल्याने उसाची प्रत खालावते. परिणामी त्याच्या वजनातही घट होते. वजनात घट झाली की शेतकऱ्यांच्या उत्पन्नातही घट होते. यामुळे ऊस उत्पादक शेतकऱ्याला नाहक नुकसान सहन करावा लागत आहे. कादवा सहकारी साखर कारखान्याने उसाला एका टनाला 2 हजार 750 रुपये भाव नक्की केला आहे. तुरा निघाल्यामुळे दोन टन वजनाचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे ऊस उत्पादक सांगत असून त्वरित तालुक्यातील उसाची तोड सुरु करण्याची मागणी करत आहे .

सध्या सकाळी धुके, दुपारी ऊन व रात्री थंडी असे वातावरणातील अनिश्चिततेमुळे तालुक्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जगदळे यांनी सांगितले. उसाच्या वजनात वाढ होण्यासाठी रासायनिक खताची मात्रा शेतकऱ्यांनी देण्याची माहिती त्यांनी दिली.

265, 86032 या दोन उसाच्या जातीची लागवड मोठ्या प्रमाणात झाली असून ऊस लागवडीला एकरी खर्च 70 हजार रुपये खर्च येत असतो. त्यात उसाचे बियाणे पाच गुंठे 4 हजार 500 रुपये खर्च येत असल्याचे येथील शेतकरी शंकर कड यांनी सांगितले.

हेही वाचा - नाशिक-दिल्ली विमानसेवेला ब्रेक; पर्यटन, उद्योगावर परिणाम

Intro:नाशिक - दिंडोरी तालुक्यात उस लागवडीचे क्षेत्र २६३८हेक्टर श्रेत्र असुन दिंडोरी तालुक्यात बदलत्या हवामानामुळे उसाला तुरे फुटल्यामुळे उस उत्पादनाच्या वजनात घट होण्याची शेतकऱ्यांना चिंता शेतकरी शंकर कडयाने इटी व्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली .
Body:उसाची लागवड १० आक्टोबर २०१९ रोजी लागवड केलेला प्लाट असून बारामहीण्याचा उस झाल्यानंतर तेरावा महीना संपत आला असल्यामुळे उसाला तुरे निघाल्यामुळे एकरी एक टण उसाचा तुरे निघाल्यामुळे वजनात घट येते येण्याची भिती शेतकरी करत आहे . कादवा सहकारी साखर कारखाण्याने उसाला एका टनाला २७५० रुपये भाव नक्की केला असून तुरा निघाल्यामुळे दोन टन वजनाचे नुकसान सहन करावे लागत असल्याचे उस उत्पादक सांगत असून त्वरीत तालुक्यातील उसाची तोड सुरु करण्याची मागणी करत आहे . Conclusion:दिंडोरी तालुक्यातील वातावरणातील बदलामुळे एका दिवसात तिन ऋतूचा अनुभव घ्यावा लागत आहे नोव्हेबर माहिण्यापासून हवामान बदल सातत्यांने घडत असल्यामुळे उसाला तुरे येण्यास सुरवात झाली आहे त्यामुळे उसाच्या उत्पादकता कमी होत आहे तसेच सध्या सकाळी धुके , दुपारी उण , व रात्री थंडी असे वातावरणातील अनिश्चित मुळे तालुक्यात जवळपास सगळीकडेच उसाला तुरे येण्याचे प्रमाण वाढले असल्याचे तालुका कृषी अधिकारी अभिजित जगदळे यांनी सांगीतले उसाच्या वजनात वाढ होण्यासाठी रासायनिक खताची मात्रा शेतकऱ्यांनी देण्याची माहीती त्यांनी दिली

दिंडोरी तालुक्यात उसात २६५, ८६०३२, या दोन उसाच्या जातीची लागवड मोठया प्रमाणात झाली असून उस लागवडीला एकरी खर्च ७० हजार रुपये खर्च येत असतो त्यात उसाचे बियाणे बियाणे पाच गुंठे४,५०० रुपये खर्च येत असल्याचे शंकर कड यांनी सांगीतले
बाईट शंकर कड उस उत्पादक दिंडोरी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.