नाशिक - नाशिक पश्चिम ही राष्ट्रवादीची जागा ऐनवेळी माकपला गेल्याने या जागेवरील प्रबळ दावेदार अपूर्व हिरे यांचा पत्ता कट झाला आहे. महाआघाडी झाल्याने ही जागा आम्हाला माकपला सोडावी लागत असल्याचे राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा - इस्लामपूर मतदारसंघात शिवसेनेला भाजपच्या बंडखोरीचे आव्हान!
नाशिकच्या पश्चिम मतदारसंघातून राष्ट्रवादीचे तिकीट मिळणारच या विश्वासाने हिरे यांनी जोरदार तयारी करत प्रचारालाही सुरुवात केली होती. मात्र, अचानक गुरुवारी ही जागा माकपला सोडण्यात आल्याने हिरे नाराज झाले आहेत. त्यांनी कुठलीही वाट न बघता राष्ट्रवादीतून बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. आघाडीकडून याठिकाणी माकपला पाठिंबा दिल्याने हिरे यांनी निवडणूक लढवणारच असे ठरवले आहे. 'वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून उमेदवारीबाबत विचारणा करणार असल्याचे म्हणाले. तसेच माकप वंचितसोबतही आघाडी करत आहे. पक्षाची वेळीच दखल घ्यावी, असेही हिरे म्हणाले. म्हणून अपक्ष निवडणूक लढवणार आहे, अशी भूमिका हिरे यांनी घेतली आहे.
हेही वाचा - जोरदार शक्तीप्रदर्शन करत आदित्य ठाकरेंचा उमेदवारी अर्ज दाखल, ठाकरे कुटुंबीय उपस्थित