येवला (नाशिक) - पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर येवला शहरातील शनी पटांगण, हुडको कॉलनी येथून जाणाऱ्या नाल्याची सफाई झालेली नसल्याने नाल्याची सफाई करावी अशी मागणी शहरवासीय करत होते. याबाबत ETV Bharat ने बातमी दाखवताच येवला शहरातील नालेसफाईला नगरपालिका प्रशासनाने सुरुवात केली. 20 कर्मचारी, एक जेसीपी, एक पोकलेन त्याच्या साहाय्याने नाला सफाई करण्यात येत असून इंद्रनील कॉर्नर येथील नाला, शनी पटांगण तसेच अमरधाम येथील नाला सफाईला कर्मचाऱ्यांनी सुरुवात केली आहे.
काय होती मागणी - येवला शहरातील अमरधाम, शनी पटांगण, हुडको कॉलनी येथून जाणारा नाल्याची पावसाळा तोंडावर आला असून देखील साफसफाई झाली नसल्याने नाल्यांची साफसफाई करावी अशी मागणी नाल्याच्या परिसरात राहणारे नागरिक करत होते. मागील वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यामुळे या नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले. हे सर्व पाणी या नाल्याच्या परिसरातील दुकानांमध्ये तसेच घरांमध्ये घुसल्याने दुकानांच्या सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच घरातील संसार देखील पाणीच पाणी झाले होते. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या नाल्याची साफसफाई करावी, अशी मागणी नागरिक करीत होते. याबाबत ईटीव्ही भारतमध्ये यासंदर्भातील बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती. नगरपालिका प्रशासन नाल्यांची साफसफाईचे कामाला सुरुवात केली आहे.