नाशिक - दिंडोरी तालुक्यातील द्राक्ष बागांचे अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ही बातमी 'ईटीव्ही भारत'ने प्रसिध्द केल्यानंतर लगेच कृषी विभाग व महसूल विभागाने तालुक्यात पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार प्रत्येक गावात तलाठी, कृषी सहाय्यक व ग्रामसेवकच्या पथकाने पंचनामे सुरू केले आहेत.
हेही वाचा - खरिपाच्या पिकांची दुरवस्था; शेतकऱ्याने गाण्यातून मांडली व्यथा..
नुकसानग्रस्त भाग -
दिंडोरी तालुक्यातील खेडगाव, तळेगाव, तिसगाव, आंबेदिंडोरी, आंबेवनी, वरखेडा, परमोरी, लखमापूर, तळेगाव, अवनखेड, ओझरखेड, करंजवण, वणी परिसरात व अहिवंतवाडी भागात मोठ्या प्रमाणावर द्राक्ष, सोयाबीन, भात, वरई, नागली, कांदा या पिकांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे.
गारपीटीमुळे द्राक्ष घड गळून पडले आहेत. तसेच द्राक्षांवर होणार खर्चही अव्वाच्या सव्वा झाला आहे. खर्चाची रक्कमही मिळणार नसल्याने शेतकरी फार विवंचनेत आहे.
अभिजित जगदाळे तालुका कृषी अधिकारी दिंडोरी - 'प्रत्येक ग्रामपंचायतअंतर्गत तिन ते चार वाडया-वस्त्या असल्यामुळे प्रशासनाचे मनुष्यबळ कमी पडत आहे. काही कृषीसहाय्यकाकडे दोन अतिरीक्त जबाबदारी असल्यामुळे तलाठी व ग्रामसेवक यांच्यावर विश्वास ठेवून संपूर्ण तालुक्यात पंचनामा करणार आहे.' असे दिंडोरी तालुक्याचे कृषी अधिकारी अभिजीत जगदाळे म्हणाले
हेही वाचा - २०५० मध्ये मुंबई बुडणार! वाचवायची असेल तर भुयारी मेट्रोचे काम थांबवा - गिरीष राऊत