ETV Bharat / state

मनमाडला ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी; विविध धार्मिक कार्यक्रमांचे झाले आयोजन

ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एकात्मता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मक्का मदिना व भव्य मस्जिदची प्रतिकृती बनविण्यात आली होती. शहरातील अनेक चौकात विविध सामाजिक संघटनांतर्फे सरबत आणि पाणी वाटप करण्यात आले होते. 'ईस्लाम जिंदाबाद नारा-ए-तकबीर', 'अल्लाहू अकबर', अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होते.

मनमाडला ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी
author img

By

Published : Nov 10, 2019, 5:54 PM IST

नाशिक - इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणारा ईद-ए-मिलादुन्नबी हा सण मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती. शहरातील जामा मस्जिदजवळून या मिरवणुकीस सुरुवात करण्यात आली. शहरातील सर्व मशिदीचे प्रमुख मौलानांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक शांततेत पार पडली.

मनमाडला ईद-ए-मिलादुन्नबी उत्साहात साजरी

हजरत पैगंम्बर मोहम्मद यांनी जगाला शांती, बंधुभाव व समानतेची शिकवण दिली होती. त्यांच्या जयंतीनिमित्त आज मनमाडमध्ये भव्य जुलूस काढण्यात आले होते. त्यात हजारो मुस्लिम बांधवांसोबत इतर धर्मीय नागरिक सहभागी झाले होते. एकात्मता चौकात पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी शहरातील नागरिकांच्या वतीने जुलूसचे स्वागत केले व प्रमुख मौलानांचे सत्कार केले.

त्याचबरोबर, ईद-ए- मिलादुन्नबीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. शहरातील एकात्मता चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मक्का मदिना व भव्य मस्जिदची प्रतिकृती बनविण्यात आली होती. शहरातील अनेक चौकात विविध सामाजिक संघटनांतर्फे सरबत आणि पाणी वाटप करण्यात आले होते. 'ईस्लाम जिंदाबाद नारा-ए-तकबीर', 'अल्लाहू अकबर', अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होते. तसेच, या मिरवणुकीत भारताचा तिरंगा ध्वज हे खास आकर्षण ठरले होते. तर आम्ही प्रथमतः भारतीय आहोत आणि आम्ही भारतीय मुस्लिम आहोत, हे आमचे भाग्य असल्याचे अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवले.

हेही वाचा- दिंडोरीतील कादवा सहकारी साखर कारखान्यात बॉयलर अग्नीप्रदिपन समारंभ

Intro:इस्लाम धर्माचे संस्थापक मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त करण्यात येणारा ईद ए मिलादुन्नबी हा सण मनमाड शहरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त भव्य मिरवणूक काढण्यात आली होती.शहरातील जामा मस्जिदजवळून या मिरवणूकिस सुरुवात करण्यात आली.शहरातील सर्व मशिदीचे प्रमुख मौलाना यांच्या नेतृत्वाखाली ही मिरवणूक शांततेत पार पडली.Body:जगाला शांती,बंधुभाव व समानतेची शिकवण देणारे हजरत मोहंमद पैगंम्बर यांची जयंती अर्थात ईद-ए-मिलादुन्नबी आज मनमाड मध्ये पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरी करण्यात आली यानिमित्त शहरातून भव्य जुलूस काढण्यात आला होता त्यात हजारो मुस्लिम बांधवा सोबत इतर धर्मीय नागरिक सहभागी झाले होते.एकात्मता चौकात पोलीस निरीक्षक राजेंद्र कुटे, माजी आमदार जगन्नाथ धात्रक यांनी शहरातील नागरिकांच्या वतीने जुलूसचे स्वागत करून प्रमुख मौलांनांचा सत्कार केला.ईद-मिलादुन्नबी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते शहरातील एकात्मता चौक डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मक्का मदिना व भव्य मस्जिदचे प्रतिकृती बनविण्यात आले होते.शहरातील अनेक चौकात विविध सामाजिक संघटना तर्फे सरबत आणि पाणी वाटप करण्यात आले होते.Conclusion:ईस्लाम जिंदाबाद नारा ए तकबिर अल्लाहू अकबर अशा विविध घोषणाबाजीने परिसर दणाणून गेला होता.तसेच या मिरवणुकीत भारताचा तिरंगा ध्वज हे खास आकर्षण ठरले होते तर आम्ही प्रथमतः भारतीय आहोत आणि आम्ही भारतीय मुस्लिम आहोत हे आमचं भाग्य असल्याचे अनेक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी यावेळी बोलून दाखवले आजचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला

आमिन शेख मनमाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.