ETV Bharat / state

शिक्षण रोजगाराभिमुख असायला हवे - आदित्य ठाकरे - thackerye

महाराष्ट्राचे विकास व्हिजन कसे असावे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देणे यास प्राथमिकता असेल. उद्योगाचे पारंपरिक स्वरूप बदलत असून रोबोटद्वारे कामे केली जातात. बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता शाळा महाविद्यालयीन शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल अपेक्षित आहेत.

आदित्य ठाकरे
author img

By

Published : Apr 8, 2019, 9:15 AM IST

नाशिक - भारताच्या तरुण पिढीसमोर रोजगार ही सर्वात मोठी समस्या आहे. हे चित्र बदलायचे असेल, तर शिक्षणाच्या पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे. त्यास आपले प्राधान्य असून शिक्षण हे रोजगाराभिमुख असले पाहिजे, असे मत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांसमोर मांडले. ते 'आदित्य संवाद' या कार्यक्रमात बोलत होते.

नाशिकमध्ये विद्यापीठाचे उपकेंद्र असायला हवे असे ठाकरे म्हणाले

महाराष्ट्राचे विकास व्हिजन कसे असावे, या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देणे यास प्राथमिकता असेल. उद्योगाचे पारंपरिक स्वरूप बदलत असून रोबोटद्वारे कामे केली जातात. बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता शाळा महाविद्यालयीन शिक्षण पद्धतीत काळानुसार बदल अपेक्षित आहेत. नाशिकमधील महाविद्यालये पुणे विद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे उपकेंद्र नाशिकमध्ये व्हावे, याबाबत तुम्हाला काय वाटते? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्यावेळी नाशिकमध्ये उपकेंद्र नक्कीच झाले पाहिजे. यासाठी पाठपुरावा सुरू असून लवकरच ते केंद्र कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

बदल व आव्हाने डोळ्यासमोर ठेवून केजी टू पीजी अभ्यासक्रम बदलून तो रोजगाराभिमुख केला पाहिजे असे ठाकरे यांनी सांगितले. त्यांनी इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे उदाहरण दिले. देशात परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षण पद्धतीत आमुलाग्र बदल करणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. नाशिकच्या विकासासाठी खासदार हेमंत गोडसे यांनी कोणते काम केले? या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी विमानतळ, सिन्नर बायपास, हायवे, नवीन लोकल, शासकीय रुग्णालय, उड्डाणपूल या कामांची नावे सांगितली.

Intro: भारताच्या तरुण पिढीसमोर रोजगार ही सर्वात मोठी समस्या आहे हे चित्र बदलायचे असेल तर शिक्षणाची पद्धतीत बदल करणे गरजेचे आहे त्यास आपले प्राधान्य असून शिक्षण हे रोजगाराभिमुख असले पाहिजे असे मत युवासेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी युवकांसमोर मांडले

Body: नाशिकमध्ये आयोजित आदित्य संवाद या कार्यक्रमात युवकांशी संवाद साधताना ते बोलत होते महाराष्ट्राचे विकास व्हिजन कसे असावे या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले तरुणाईला रोजगार उपलब्ध करून देणे यास प्राथमिकता असेल उद्योगाचे पारंपरिक स्वरूप बदलत असून रोबोट द्वारे कामे केली जातात बदलते तंत्रज्ञान लक्षात घेता शाळा महाविद्यालयीन शिक्षण पद्धती काळानुसार बदल अपेक्षित आहे नाशिक मधील महाविद्यालय ही पुणे विद्यापीठाचे संलग्न असून त्यांचे उपकेंद्र नाशिक मध्ये व्हावे याबाबत तुम्हाला काय वाटते असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला त्यावेळी नाशिकमध्ये उपकेंद्र नक्कीच झाले पाहिजेत यासाठी पाठवावा सुरू असून लवकरच ते केंद्र कार्यान्वित होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला

Conclusion: बदल व आव्हाने डोळ्यासमोर ठेवून केजी टू पीजी अभ्यासक्रम बदलून तो रोजगाराभिमुख केला पाहिजे असे ठाकरे यांनी सांगितले असून त्यांनी इंग्लंडचे माजी पंतप्रधान टोनी ब्लेअर यांचे उदाहरण दिले देशात परिवर्तन घडवायचे असेल तर शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल करणे गरजेचे आहे असे त्यांचे मत होते नाशिकच्या विकासासाठी खा हेमंत गोडसे यांनी कोणते काम केले या प्रश्नाचे उत्तर देत त्यांनी विमानतळ सिन्नर बायपास हायवे नवीन लोकल शासकीय हॉस्पिटल उड्डाणपूल झालेल्या कामाची नावे सांगितली
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.