येवला- पेट्रोल-डिझेलचे दर हे शंभरीपार गेले आहेत. दरवाढीमुळे ट्रॅक्टरद्वारे शेतीची कामे करण्यास परवडत नाही. व बैलजोडी नसल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांनी देशी जुगाड लावत सायकलला कोळपणी यंत्र जोडत, शेतात कोळपणी करत असल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.
सायकलद्वारे कोळपणी
तालुक्यातील उत्तर-पूर्व भागांमध्ये सुरुवातीला पडलेल्या पाऊसावर अनेक शेतकर्यांनी पेरणी केली. पिकाची कोळपणी करण्याची वेळ आली, मात्र पेट्रोल व डिझेलच्या दरवाढीमुळे व अनेक शेतकऱ्यांकडे बैलजोडी ही नसल्यामुळे कोळपणीचा खर्च परवडत नाही. म्हणून शेतकऱ्याने स्वतः देशी जुगाड लावत सायकलच्या चाकाला कोळपणी यंत्र जोडले आहे. आणि त्या सायकलद्वारे शेतात कोळपणी करत असल्याचे चित्र सध्या येवला तालुक्यात उत्तर पूर्व भागात दिसत आहे .
दुबार पेरणीचे संकट
हेही वाचा- नांदेड जिल्ह्यात पावसाची दडी, शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट